Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ मार्च, २०२३

माजी पोलीस आयुक्त प्रतापराव देगावकर साहेब यांनी सटाणा येथे भाजप किसान मोर्चा चे उप प्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांच्या निवासस्थानी यांची भेट घेतली व शेतकऱ्यांविषयी चर्चा केली



शेतकऱ्यांचे कैवारी, नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक आदरणीय डॉ.श्री प्रतापराव दिघावकर साहेबांचे सटाणा शहरात आगमन झाले असता शेतकरी मित्र, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बिंदुशेठ शर्मा यांच्या निवास्थानी साहेबांनी सदिच्छा भेट दिली, त्यात शेतकऱ्यांचे प्रशांवर चर्चा करून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी मोठा लढा उभा करून त्यांच्या समस्या सोडण्यावर भर देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल व भारतीय जनता पार्टी या पक्षावर शेतकऱ्यांची जी नाराजी आहे ती दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आपण येणाऱ्या काळात करणार आहोत असेही यावेळी बिंदू शेठ शर्मा यांनी डॉक्टर प्रतापराव देगावकर यांच्याशी बोलताना केले येणारा काळ हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडे पाहून लोक भाजपाला मतदान करतील असा विश्वासी यावेळी बिंदू अत्यंत निस्वार्थीपणे आपण शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात राज्यात अग्रस्थानी आहात व येणाऱ्या काळात पक्ष आपल्या कामाची दखल घेऊन आपल्याला एक मोठी संधी उपलब्ध करून देणार असे मत यावेळी शेतकऱ्यांकडून मांडण्यात आले तसेच आपण करीत असलेले शेतकऱ्यांसंदर्भात कामाचाही दाखला यावेळी दिघावकर साहेबांनी बिंदू शेठ शर्मा यांना दिला व भारतीय जनता पार्टीचे उपप्रदेश अध्यक्ष तसेच शेतकरी मित्र
श्री बिंदुशेठ शर्मा यांनी आदरणीय माजी पोलीस आयुक्त डॉ.श्री दिघावकर साहेबांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध