Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ मार्च, २०२३

शिरपूर शहर पोलीस स्टेशनची कामगीरी मानवी मेंदुवर परिणाम करणारा गांजा सदृश्य नावाचा अंमली पदार्थ एकुण १,६९,०८०/-रुपये किंमतीचा ०२ आरोपीतांकडून हस्तगत



शिरपूर प्रतिनिधी:-दि.२१/३/२०२३ रोजी पो.नि.श्री अन्साराम आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे हिरो स्प्लेंडर मोटार सायकल क्र.एम.पी.४६ एम.एम.८४७५ या मोटार सायकलवर एक प्लॅस्टिक गोगटी मध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ भरलेली घेवुन ते दोघे राष्ट्रीय महामार्ग क्र.०३ ने सांगवी कडुन शिरपुर फाटा येथे येणार असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाले वरुन पो.नि. श्री अन्साराम आगरकर यांनी वरिष्टांचे मार्गदर्शन घेवून रेडकामी पोलीस स्टाफ, तसेच श्री.रविंद्र कुमावत नायब तहसिलदार तहसिल कार्यालय शिरपुर, दोन शासकीय पंच,वजनकाटा धारक व फोटोग्राफर अशांसह शिरपुर फाटयावर जावुन सापळा लावुन इसम नामे- १) विजय ज्ञानदेव विचे, वय-३४, व्यव- मजुरी.रा. शिरसुफळ, ता. बारामती, जि. पुणे २) ईलामसिंग कदरसिंग अखडे, वय २१ वर्ष, व्यव मिस्तरी काम. रा. झापडी पाडा,ता.सेंधवा,जि. बडवाणी म.प्रदेश अशांवर छापा कारवाई करुन पंचां समक्ष ताव्यात घेवुन त्यांचे कडील गोणटीत असलेल्या माला बाबत खात्री करता सदर प्लॅस्टिकच्या गोणटीत एकुण ११ युडयांमध्ये एकुण २१.०९ किलो ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ व दोन मोबाईल हॅण्डसेट आणि मोटारसायकल असा एकुण १.६९.०८०/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेने त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोहेकॉ ९१९ लावुराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर पो.स्टे. गु.र.नं. १०६/ २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम २० (क) व २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करुन उल्लेखनीय कामगिरी केली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पो नि अन्साराम आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि / गणेश कुटे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत काळे. पोलीस निरीक्षक श्री अन्साराम आगरकर अतिरीक्त कार्यभार मा.उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे. चे पोउपनि गणेश कुटे, पोउपनि / संदीप मुरकूटे, पोहेकॉ / ६०३ ललित पाटील, पोना / १५५२ मनोज पाटील, पोकॉ/ १५६४ गोविंद कोळी, पोकॉ/१४६१ विनोद आखडमल, पोकों / १७२२ सचीन वाघ. पोकॉ/९०१ प्रशांत पवार, पोकों/ ६७६ प्रविण गोसावी, पोकॉ/१५९३ मुकेश पावरा, पोक ७२७ भट्ट साळुंखे, पोकों/०८ कैलास चौधरी, पोकों ४४७ भूषण कोळी अशांनी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध