Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ मार्च, २०२३

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित कु. गुलाम हौस याला बसविला कृत्रिम हात आणि पाय ,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचा आरोग्याचा महायज्ञ अविरतपणे सुरू



जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणाऱ्या गुलाम हौस याला काही महिन्यांपूर्वी विदूतशॉक लागून अपघात झाला होता. या मध्ये त्याला एक हात आणि पाय गमवावा लागला होता. ही बातमी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना समजतास त्यांनी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व संवेदनशील खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांना सांगितली. लगेच खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी गुलाम साठी लागणारा सर्व खर्च शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून उचलला जाईल असे सांगितले,आणि आज दिलेला शब्द पूर्ण ही केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थित मध्ये गुलाम हौस याला कृत्रिम हात आणि पाय बसवण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, रूग्णसेवक राम रेपाळे, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख राम राऊत उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध