Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ मार्च, २०२३

साक्री तालुक्यातील सिंनबन व छडवेल कोरडे येथे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा धावता दौरा, नुकसान ग्रस्थ शेतीची केली पीक पाहणी व शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.



आज साक्री तालुक्यातील अवकाळी गारपीटग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच पीक पाहणी करण्यासाठी आज सनासुदीच्या दिवशी गुढीपाडवा असताना माननीय महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार साहेब यांचा नुकसानाची पाहणी दौरा सिंधबन व छडवेल कोरडे येथे होता या दरम्यान त्यांनी प्रशासनाला पंचनामे करून त्वरित शासनाकडे सुपूर्त कराव अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना व साक्रीचे तहसिलदार सौ.आशा गांगुर्डे याना दिल्यात तसेच येणारी मदत ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल आम्ही विधिमंडळात मागणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी करून साखरी तालुक्यात ज्या ज्या गावात गारपिटीचा तडाका बसून पिके उध्वस्त झाली आहेत त्यांना त्याचा मोबदला 100% मिळून देऊ असेही यावेळी कृषी मंत्र्यांकडून सांगण्यात आले कृषी मंत्री यांनी दिले यावेळी गावचे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य तालुका कृषी अधिकारी सी.के.ठाकरे गटविकास अधिकारी सूर्यवंशी कृषी अधिकारी पंचायत समिती नेतनराव साहेब पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब शिवसेना जिल्हाध्यक्ष सतीश तात्या महाले साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री महोदयांनी यावेळी सर्वांचे सहकार्य लाभले म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचे विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे तसेच गावकऱ्यांचे आभार मानले तसेच गावकऱ्यांनीही प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध