Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ मार्च, २०२३

पिंपळनेर मध्ये कचऱ्याच्या आडून गुटख्याची तस्करी ट्रक सह बारा लाखांचा मुद्देमाल एलसीबीच्या पोलिसांकडून जप्त...



पिंपळनेर साक्री,गुजरात राज्यातील सुरत येथून साक्री धुळे मार्गे मालेगाव शहरात होणारी राज्य प्रतिबंधित गुटख्याची तस्करी धुळे एल सी बी ने उघड केली आहे. या कारवाई ट्रकसह बारा लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना सूरतहून मालेगाव कडे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकाला कारवाईचा सूचना केल्या पथकाला दहिवेल गावात सदर संशईत ट्रक दिसतात ट्रक चालकाला थांबून चौकशी करण्यात आली त्याने शेख असलम शेख उस्मान वय वर्ष 43 आजाद नगर घर नं.5 रा.मालेगाव असे नाव सांगितले त्याच ट्रक सह साक्री पोलीस ठाण्याच्या आवारात आणले असता प्रक क्रमांक एम एच 41 जी 71 65 ची पंचासमक्ष तपासणी केली या तपासणीत सदर ट्रकमध्ये 98 हजार चारशे रुपये किमतीचा विमल पान मसाला व तंबाखू एक लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल प्लास्टिक कचरा व कपड्यांचे गट्टे आढळून आले या मुद्देमालसह पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल व दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण बारा लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी धुळे एल सी बी पोलीस कॉन्स्टेबल महिंद्रा सपकाळ यांच्या फिर्यादीवरून साक्री शहर पोलीस ठाण्यात शेख असलम शेख उस्मान सह त्यांच्या साथीदार सुफियांन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे धुळे एल सी बी चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी,संजय पाटील,संतोष हिरे,सतीश पवार पंकज खैरमोडे, सपकाळ यांच्या पथकाने केली पुढील तपास आर व्ही निकम करीत आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध