Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात.... राज्य माहिती आयुक्तांनी अपिलकर्त्याला १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश...
माहिती अधिकाराचे उल्लंघन करणे पडले महागात.... राज्य माहिती आयुक्तांनी अपिलकर्त्याला १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश...
नागपूर: नागपूर येथील शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयातील जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्याने राज्य माहिती आयुक्तांनी अपिलकर्त्याला १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश जन माहिती अधिकाऱ्याला दिले.ही भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याने भरपाईची रक्कम वाढवण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी १० डिसेंबर २०१९ रोजी लक्ष्मीनगर स्थित शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाकडे माहिती अधिकारात अर्ज केला. महाविद्यालयातील जन माहिती अधिकारी प्रमोद राऊत यांनी आपल्या या महाविद्यालयाशी संबंध नसल्याचे सांगत माहिती निरंक असल्याचे उत्तर दिले.हे उत्तर माहिती अधिकाराचे उल्लंघन असल्याचे सांगत कोलारकर यांनी त्यावर प्रथम अपील दाखल केले.
तरीही प्रमोद राऊत यांनी अर्ज प्रथम अपीलीय अधिकाऱ्याकडे न पाठवता १३ फेब्रुवारी २०२० रोजी परस्पर निकाली काढला.कोलारकर यांनी त्यावर राज्य माहिती आयुक्तांच्या नागपूर खंडपीठाकडे १९ ऑगस्ट २०२२ रोजी अपिल केले. ४ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या सुनावणीत राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी जन माहिती अधिकाऱ्याला अपिलार्थीस झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी १० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.ही रक्कम माहिती देण्यास झालेल्या विलंबाला जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्याकडून वसूल करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखांना असल्याचेही आदेशात स्पष्ट केले.या आदेशनंतरही कोलारकर यांना महाविद्यालयाकडून भरपाई दिली गेली नाही.त्यावर कोलारकर यांनी पुन्हा राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केले. त्यावर आयुक्तांनी तीव्र नाराजी दर्शवत १५ मार्च २०२३ रोजी अर्ज स्वीकारेपर्यंत किंवा माहिती देईपर्यंत प्रत्येक दिवसाचे २५० रुपये प्रमाणे जन माहिती अधिकाऱ्यावर शास्ती अथवा शास्तीची एकूण रक्कम २५ हजारांहून जास्त असू नये असा निर्णय दिला. आदेशात १० हजार रुपये भरपाईची रक्कम कार्यालय प्रमुखांना वसूल करण्याचे स्वेच्छाधिकार दिले गेले होते.
परंतु कार्यालय प्रमुखांनीही काही केले नसल्याने आता माहिती आयुक्तांनी या आदेशाची प्रत संचालक,मुंबई, संचालक- जिल्हा कोषागार अधिकारी, अधिष्ठाता- शासकीय कला अभिकल्प महाविद्यालयाला दिली आहे.येत्या दोन आठवड्यात या प्रकरणात काय केले, याबाबतचा अहवाल या सगळ्यांना मागितला आहे.त्यामुळे महाविद्यालयातील वरिष्ठांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे कोलारकर यांनी सांगितले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा