Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

कॉग्रेस नेते खा.राहुल गांधीची खासदारकी रद्द धुळ्यात पडसाद काँग्रेस पक्षाने रास्ता रोकोसह केली तीव्र निदर्शने



धुळे- केंद्रातील मोदी सरकारने हुकूमशाही पध्दतीने देशाचे नेते खा.राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्याचे तीव्र पडसाद धुळ्यात पडले. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे येथे काँग्रेस भवनासमोर काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.यावेळी काही काळ काँग्रेस पदाधिकार्‍यांनी रस्ता रोकोही केला. दरम्यान हुकूमशाही निर्णयाविरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत परिसर दणाणून गेला होता.
देशाचे काँगे्रस नेते खा.राहूल गांधी यांना दोन दिवसापूर्वी सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती.या कारणामुळे केंद्रातील भाजपा सरकारने हुकूशाही तंत्राचा वापर करीत खा.राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केली.या निर्णयामुळे देशात असंतोष निर्माण झाला आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळ्यात तीव्र निदर्शने करण्यात आली. आज दि.24 मार्च रोजी दु.4 वा.धुळ्यातील काँग्रेस भवनाजवळ शेकडो कार्यकर्त जमा झाले, आणि मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात घोषणाबाजी सुरु झाली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत काही काळ रस्ता रोकोही केला. यावेळी बोलतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी सांगितले कि, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकशाहीचा घात करण्याचे काम केले आहे.सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधी पक्षाच्या नेतृत्वाचा घोट घेण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. सत्य बोलत लोकशाही टीकविण्याचे काम जो कोणी करीत असलेल्या त्यांना यंत्रणेच्या माध्यमातून संपण्यात येत आहे. खा.राहूल गांधी यांच्या नेतृत्वाली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली.देशातील कोटयावधी जनता काँग्रेस पक्षाची जोडली गेली. हीच भिती भाजपवाल्यांना सतावू लागल्याने राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केली. मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही तर यापुढे आक्रमकपणे आंदोलन छेडले जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी दिला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे,राज्य सरचिटणीस युवराज करनकाळ,ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे,बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर,जिल्हा काँग्रेस सचिव डॉ.दरबारसिंग गिरासे, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे,बाजीराव पाटील,माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील,तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके,काँग्रेसचे प्रदीप देसले,राजेंद्र भदाणे,शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसैन,बापू खैरनार, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, पं.स.सदस्य राजेंद्र देवरे, प्रकाश पाटील शिंदखेडा,रावसाहेब पाटील,माजी सरपंच सोमनाथ पाटील,ऋषी ठाकरे,हिरामण पाटील,शिवाजी अहिरे,पप्पू सहानी, भिवसन अहिरे, हरिभाऊ चौधरी, जावेद मल्टी, जावेद देशमुख, साजिद अन्सारी, जावीद शहा, नरेंद्र पाटील,सुरेश पाटील,कांतीलाल पाटील,हरीभाऊ अजळकर,छोटूभाऊ चौधरी,सौ.अर्चना पाटील, बानुबाई शिरसाठ,आबा पगारे, हिंमत बाचकर, पंकज चव्हाण, निलेश खैरनार,निलेश पाटील,कृष्णा पाटील,संदिप पाटील यांच्यासह आंदोलनात धुळे जिल्हा काँग्रेस,धुळे शहर काँग्रेस,धुळे महिला काँग्रेस यांसह काँग्रेस प्रणित विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध