Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २५ मार्च, २०२३

बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी मित्र बिंदु शेठ शर्मा यांना बागलांनचे वैभव असलेल्या भीमा शंकर पुरकाराने सन्मानित केले.



नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे शेतकऱ्यांचे हेल्पलाइन म्हणून देखील त्यांना संबोधले जाते तुम्ही फक्त एक कॉल करा तुमची समस्या सुटली असं समजा इतक्या विश्वासाने शेतकऱ्याच्या पाठीवर हात ठेवून काम करण्याची पद्धत शर्मा साहेबांची आहे कुठलेही क्षेत्र असो एका फोनवर शेतकऱ्यांच्या समस्यांवर ताबडतोब निराकरण करून त्यांचे समाधान करणारा बागलांचा वाघ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते कुठलेही क्षेत्र असो प्रचंड प्रभाव हा प्रशासनावर त्यांचा राहतो आपल्या हटके स्वभावाची झलक ते नेहमीच अधिकाऱ्यांना दाखवत असतात आणि लोकांची कामे करीत असतात त्यांना अनेक नावाने संबोधता येईल अशा उपाध्या त्यांच्याकडे आहेत त्यातच त्यांना एका नवीन पुरस्काराने बागलांच्या शेतकऱ्यांनी सन्मानित केले आहे
शेतकरी मित्र व भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र उप प्रदेश अध्यक्ष माननीय बिंदू शेठ शर्मा यांनी बागलांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या अडीअडचणींसाठी नेहमीच तत्परतेने काम करून स्वतःचे व आपल्या पक्षाचे नाव लौकिक करून बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये मोठी लोकप्रियता तयार केले आहे.या अनुषंगाने वै.ह.भ.प.संत मिराबाई पुण्यतिथी निमित्ताने तीर्थक्षेत्र भीमाशंकर पावन पुण्यनगरीत शेतकरी मित्र बिंदुशेठ शर्मा यांना भीमाशंकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित संजय विठ्ठल ,सुधाबापू,काहणू अहिरे,रमेश मुळे, पप्पु खैरनार ,स्वामी मुळे. तसेच बागलाण तालुक्यातील असंख्य शेतकरी या कार्यक्रमात उपस्थित होते.शेतकऱ्यांकडून शर्मा साहेबां च्या कामाचे व त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे भरपूर असे कौतुक करण्यात आले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध