Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २४ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील शिवाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून दिला न्याय, तालुका भूमी अभिलेख व महसूल विभागाला दिले चौकशीचे आदेश
साक्री तालुक्यातील शिवाजीनगरच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून दिला न्याय, तालुका भूमी अभिलेख व महसूल विभागाला दिले चौकशीचे आदेश
साक्री तालुक्यातील मौजे शिवाजी नगर ता.साक्री जि.धुळे येथील जागतिक स्तरावर नाव असलेल्या महाजनकोचा (गोदरेंज) सौर ऊर्जा प्रकल्पात शिवाजीनगर येथील ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गेलेल्या आहेत किंवा अधि गृहीत केलेल्या आहेत अशा शेतजमिनी त्या संबंधित शेतकऱ्यांना कसण्यासाठी म्हणजेच शेती करण्यासाठी परत मिळाव्यात या विषयावर गेल्या दोन वर्षापासून पाठपुरावा करीत असलेले दहा ते बारा शेतकरी आज साक्री तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा धुळे याच्या उपस्थितीत व महाजनकोचे वरिष्ठ अधिकारी महसूलचे वरिष्ठ अधिकारी साक्रीचा प्रभारी तहसीलदार गांगुर्डे मॅडम व अप्पर तहसीलदार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब व सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव महिला बगीनी तसेच भूमि अभिलेखचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सामूहिक बैठक बोलावून शिवाजी नगर शेती गट क्रमांक 128 मधील शेती व ती शेत जमीन कसणारे शेतकरी या सर्वांसोबत सविस्तर चर्चा करून आजच्या आज मार्ग काढून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देऊ असे लेखी आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले. व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ व कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ असे आश्वासन यावेळी दिले तसेच त्यांना कुठल्याही शासकीय योजनांपासून वंचित ठेवू नये व त्यांना घरकुल योजने अंतर्गत घर उपलब्ध करून द्यावी तसेच शेती विषयक इतर विविध योजनांचा लाभ मिळून द्यावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदारांना दिल्या. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रहार संघटनेचे पदअधिकारी श्री.नानाभाऊ शेलार रा.वर्धाणे व त्यांचे सहकारी श्री.राजेंद्र कोरडकर आणि श्री.राहुल गवळे यांनी शेतकऱ्याचे प्रश्न व त्यासंबंधी कागदपत्रांची पूर्तता करून प्रशासनाच्या चुका व संबंधित प्रकल्पाचा अधिकाऱ्यांच्या चुका जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या.शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आम्ही प्रकल्पाच्या विरोध करणार नाही असेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीविषयक लढ्याला अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय मिळून दिला त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचे अभिनंदन करण्यात आले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा