Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २३ मार्च, २०२३

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल असलेले खोटे गुन्हे मागे घ्या...पदाधिकारी कार्यकर्त्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदनातून मागणी.



धुळे - स्वंयभू इंटरप्रायजेस कंपनीचे मॅनेजर अभिजित फडतरे यांना शहरातील कचरा समस्या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यानी धुळेकर जनतेबाबत अपमानास्पद वाक्य वापरले होते त्यामुळे राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करत अंडी मारली होती.
संबंधित व्यक्ती सरकारी कर्मचारी नसून एका प्रायव्हेट कंपनीच्या खाजगी मॅनेजर आहे. तरी राजकीय दबावाखाली ३५३ सह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खंडणी, दरोडा, चोरी, जीव घेणा हल्ला अशा पध्दतीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे हे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचा निवेदनातून केली आहे...
शहरात घाणीचे साम्राज्य झालेले आहे. घंटागाडी वेळेवर येत नाही. आदी विषयांबाबत धुळे महापालिकेत संविधानिक पद्धतीने आंदोलन सुरू होते
परंतू यादरम्यान स्वंयभू इंटरप्रायजेस कंपनीचे मॅनेजर अभिजित फडतरे यांनी धुळेकर जनतेबाबत अपमानास्पद वाक्य वापरले. "धुळेकर जनता घाण करते", "धुळेकरांना वळण नाही" दारुच्या बाटल्या फेकतात." अशी वाक्य वापरल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. व त्यांनी कंपनीच्या मॅनेजरवर निषेध म्हणून शाई व अंडी फेकली.
परंतू राजकीय दबावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर खंडणी, दरोडा, चोरी, जीव घेणा हल्ला अशा पध्दतीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा पध्दतीने दडपशाही, दादागिरी व कुटनितीचा वापर करुन खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. संबंधित व्यक्ती सरकारी कर्मचारी नसून एका प्रायव्हेट कंपनीच्या खाजगी मॅनेजर आहे. तरी राजकीय दबावाखाली ३५३ चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.नागरिकांच्या न्याय, हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करीत होते. मात्र तरी देखील राजकीय दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करायचे नाही का?असा सवाल करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आला आहे.सदर खोटे गुन्हे मागे न घेतल्यास धरणे आंदोलनाचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते........

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध