Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २२ मार्च, २०२३

ऑर्चिड अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल साक्री मध्ये मराठी नवीन वर्ष गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला



आज दि. 21.3.2022 रोजी आपल्या ऑर्कीड अॅकडमी स्कुलमध्ये गुढीपाढवा सण साजरा करण्यात आला . मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने इंग्लिश मीडियम इंटरनॅशनल स्कूल येथे मराठी नवीन वर्षाचे गुढीपाडवा निमित्त उत्साहात साजरा करण्यात आला जरी आपले पाल्य इंग्रजी शाळेत शिकत असली तरी त्यांना आपल्या भारतीय संस्कृती पासून दूर जावू नये व आपल्या महान परंपरेनुसार विद्यार्थ्यांचे आचरण असावे यावर आपल्या ऑर्कीड अॅकडमी स्कुलमध्ये कटाक्षाने पाहिले जाते.यावेळी चेअरमन इंजी. मनोजकुमार भास्करराव देसले व प्रिंसीपल व शिक्षकांनी गुढीपाढव्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगीतले व विधीवत गुढी पुजन करून व गुढीला नैवद्य दाखवुन नववर्ष साजरा करण्यात आला मराठी नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना मनोज कुमार देसले चेअरमन अर्जित फाउंडेशन यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या

तरुण गर्जना वृत्तपत्र सह 
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध