Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, २९ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
खान्देश कन्या सायली पाटील यांचे मराठी चित्रपटात पदार्पण ही खान्देश वासियांसाठी अभिमानाची बाब
खान्देश कन्या सायली पाटील यांचे मराठी चित्रपटात पदार्पण ही खान्देश वासियांसाठी अभिमानाची बाब
अभिनेत्री कु.सायली नरेंद्र पाटील यांचे मूळ गाव नेवाडे ता. शिंदखेडा जि .धुळे आहे ह. मु.बावधन पुणे. ते श्री.नरेंद्र विक्रम पाटील (जाधव)व सौ. सुनीता नरेंद्र पाटील यांच्या कन्यारत्न आहेत तसेच प्रा.अरविंद विक्रम जाधव यांची पुतणी व सौ.अश्विनी भूषण पाटील(धुळे जिल्हा परिषद,अध्यक्ष) ह्यांच्या ननंद असून लेफ्टनंट डॉ.जितेंद्र जिजाबराव देसले आणि चंद्रशेखर जिजाबराव देसले(निमगुळ ता.शिंदखेडा )श्री.अनिल दादा देसले (उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती) यांची भाची आहे. अभिनेत्री सायली पाटील यांचा जन्म पुणे येथे झालेला.त्यांचे शिक्षण पुणे येथेच (आर्किटेक्चर) झालेले आहे. त्यांचा स्वतःचा आर्किटेक फॉर्म आहे.
त्यांनी पहिला सिनेमा दिग्दर्शक नागराज आण्णा मंजुळे दिग्दर्शित बॉलीवूड "झुंड" या सिनेमात भावनाचा रोल केला होता. बॉलीवूडचे महानायक,बिग बी मा. अभिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी सिनेमात पदार्पण केले होते.त्यांचा दुसरा सिनेमा झी स्टुडिओ आणि आटपाट बॅनर खाली निर्माते अभिनेते नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिर्याणी असून यात स्वतः मा. नागराज मंजुळे,सुप्रसिद्ध अभिनेते माननीय सयाजी शिंदे, युवाअभिनेते आकाश ठोसर यांच्या सोबत खानदेश कन्या सायली पाटील यांनी मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे.या चित्रपटात "गुन गून" हे गाणं महाराष्ट्रभर खूप गाजत आहे.
झी स्टुडिओ 'आणि नागराज मंजुळे यांच्या आगामी 'घर बंदूक बिर्याणी 'या चित्रपटाच्या आगळ्यावेगळ्या शीर्षकांना सर्वांचाच लक्ष वेधून घेतल आहे. त्याचबरोबर अनेकांचे लक्ष वेधलय तो या चित्रपटाची नायिका सायली पाटीलन. या चित्रपटातल्या 'गुन गुन'या गाण्यातली आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यातली रोमँटिक केमिस्ट्री बघून तरुणाई त्यांच्या प्रेमात पडली आहे.विशेषतः या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणाऱ्या सायली पाटीलची 'गुन गुन गर्ल 'अशी नवी ओळख निर्माण झाली असून ती महाराष्ट्रातल्या तरुणाईचा नवा क्रश बनली आहे.
सायली बाबत विशेष गोष्ट
'सैराट'मधल्या आर्चीच्या भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी सायलीला शॉर्टलिस्ट केलं होतं, परंतु काही कारणास्तव योग आला नाही तरी आता 'घर बंदूक बिर्याणी' मधून ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे. याच चित्रपटातल्या 'गुन गुन'या गाण्याला यु- ट्युबवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याखाली हजारो प्रेक्षकांनी गाण्यासोबतच सायली आणि आकाशाची रिफ्रेशिंग जोडी आवडल्याच्या प्रतिक्रिया ही दिले आहेत. या प्रतिसादाबद्दल सायली म्हणाली,'प्रेक्षकांचा हा प्रतिसाद मला पक्क करणारा आहे.मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवात आहे. प्रेक्षक 'गुन गुन'या गाण्यावर आणि माझ्यावर भरभरून प्रेम करीत आहेत. मी कुठेही गेले, तरी तिथं माझी ओळख 'गुन गुन गर्ल'अशीच होत आहे. ही फिलिंग खूप सुखावणारी आहे. यासाठी मी झी स्टुडिओज,मा.नागराज मंजुळे आण्णा आणि दिग्दर्शक मा.हेमंत अवताडे यांचे विशेष आभार व्यक्त करते.अशी भावना मांडली.'झी स्टुडिओज'आणि 'आटपाट प्रोडक्शन'ची निर्मिती असलेल्या 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटात आकाश आणि सायली सोबतच सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे एका दमदार आणि हटके भूमिकेत बघायला मिळणार आहेत हा चित्रपट येत्या सात एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
अभिनेत्री सायली पाटील हिला सामना वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतीत काही प्रश्न विचारलेत त्यात
तुझी ' घर बंदूक बिर्याणी 'मधील व्यक्तिरेखा नेमकी कशी आहे ?
घर बंदूक बिर्याणी मध्ये मी लक्ष्मी ही व्यक्तिरेखा साकारत आहे. माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या खूप वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. या चित्रपटासाठी नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे सर यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मला लाभले. एक हळुवार अशी ही व्यक्तिरेखा असून प्रेमाचा एक दृष्टिकोन देणारी ही भूमिका आहे. या चित्रपटात मी आणि आकाश ठोसर आम्हा दोघांवर चित्रीत झालेले एक गीत आहे. या गाण्यावर जवळजवळ पंधरा दिवस आम्ही वर्किंग केले आहे.हे गाणे बघताना तुम्हाला जाणवेल की यात एक्सप्रेशन्स ला किती महत्त्व दिले आहे.
चित्रपटातील एखादे दृश्य चित्रण करतानाचा अनुभव सांगशील ?
घर बंदूक बिर्याणी ' मधील गाण्याचा मला एका ठिकाणी लाजायचे होते. सुरुवातीला तसे लाजणे मला जमत नव्हते, या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान आम्ही जिथे राहत होतो, त्या घरातील मुलीचे लग्न ठरले होते, ती मुलगी कशी लाजत होती याचं प्रशिक्षण मी केलं आणि मग मी लाजू शकले.
'झुंड' हा तुझा पहिला चित्रपट, त्याविषयी.
मला अभिनय क्षेत्रात यायचे नव्हते. मी आर्किटेक्चर्स प्रशिक्षण घेताना नागराज सरांची टीम ' सैराट 'च्या कास्टिंगसाठी आमच्या कॉलेजला आली होती. मी त्या चित्रपटासाठी शॉर्टलिस्ट झाले होते, पण काही कारणास्तव त्या चित्रपटात काम करण्याचा योग आला नाही, पण 'झुंड' च्या वेळेला नागराज सरांनी स्वतः मला फोन केला होता, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटले की माझ्यावर कोणीतरी फ्रॅंक करत आहे. पण मग जेव्हा समजले की खरोखर नागराज सरांचा फोन आला होता, त्यानंतर मी ऑडिशन दिली आणि ' झुंड ' मधील ' भावना ' ही भूमिका मला मिळाली. सेटवर बिग बी माननीय अभिताभ बच्चन किती शिस्तप्रिय आहेत, सहकलाकाराचा ते कसा आदर करतात, हे मी स्वतः अनुभवले आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा