Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १ मार्च, २०२३
इंदापूरात रविवारी माळी समाज नव वधू-वर परिचय मोफत मेळाव्याचे आयोजन...
इंदापूर :-फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने इंदापूर,(जि.पुणे) येथील शहा सांस्कृतिक भवन मध्ये माळी समाजातील विवाह इच्छुक नव वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन हा मेळावा विनाशुल्क,कोणतीही फी न घेता आयोजित करण्यात आल्याची माहिती फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सदरचा मेळावा हा पाच मार्च रोजी दुपारी ठीक एक वाजता, शहा सांस्कृतिक भवन,एसटी स्टँड पाठीमागे इंदापूर येथे विनाशुल्क आयोजित करण्यात आलेला असुन मेळाव्यासाठी कोणतेही शुल्क,फी घेतली जाणार नाही. वधू-वर नाव नोंदणी मोफत राहील, मेळाव्यासाठी येताना वधू- वर यांनी एक तास अगोदर मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यात विवाह इच्छुक नव वधू-वर, विधवा,विधुर व घटस्फोटीत अशा सर्व स्तरातील वधू-वर यांना आपला भावी जोढीदार निवडण्यासाठी नावनोंदणी करून सहभागी होता येईल.
मेळाव्यासाठी वधू- वर यांचा बायोडाटा व्हाटसप, आॅनलाईन अथवा पोस्टाने स्विकारला जाणार नाही.मेळाव्यासाठी विवाह इच्छुक वधू-वर यांनी स्व:त समक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. वधू-वर परिचय मेळावा हा सामाजिक उपक्रम असुन माळी समाजासाठी फुले प्रहार सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन मोफत राबविण्यात येत आहे.
मेळाव्यासाठी इच्छित वधू किंवा वर हे उपस्थित राहतीलच याची खात्री कोणीही देऊ शकत नाही.त्यामुळे याबाबत कोणतीही तक्रार करता येनार नाही.तरी माळी समाजातील जास्तित जास्त विवाह इच्छुक प्रथम वधू-वर, विधवा, विधूर व घटस्फोटीत वधू - वर यांनी मेळाव्यात आपला भावी जोडीदार निवडण्यासाठी पालकांसोबत उपस्थित रहावे ही विनंती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा