Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

धुळे एस टी परिवहन महामंडळाच्या सेवेत राज्य शासनाकडून नवीन 10 बस देण्यात आल्या



प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन बसेस धुळे विभागासाठी देण्यात आले असून टाटा मेकच्या बीए 6 या अत्यंत आरामदायी असलेल्या बसेस धुळेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहेत यातील पाच बसेस या नाशिक धुळे महामार्गावर धावणार असून उर्वरित पाच बसेस या धुळे पुणे महामार्गावर धावणार आहेत प्रवाशांनी या बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे
धुळेकर प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आल्या असून धुळे आगाराला देखील दहा नवीन बसेस प्राप्त झाले आहेत अत्यंत आरामदायी असणाऱ्या या बसेस धुळे नाशिक महामार्गावर विनावाहक धावणार असून तसेच धुळे पुणे महामार्गावर देखील पाच बसेस विना वाहक जाणार आहेत धुळे आगारातून रात्री साडेदहा वाजता पुणे येथे जाण्यासाठी यातील बसेस निघणार असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांची असणारी मागणी लक्षात घेता या टाटा मेक कंपनीच्या बी ए सिक्स असणाऱ्या बसेस मुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे परिवहन महामंडळात असणाऱ्या जुन्या बसेसमुळे गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती या पार्श्वभूमीवर आता नवीन बसेस देण्यात आल्या असून विशेष म्हणजे धुळे नाशिक आणि धुळे पुणे येथे जाणाऱ्या बसेस साठी सर्व शासकीय योजना उपलब्ध असणार आहेत यात महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत आणि 75 वर्षावरील नागरिकांचा मोफत प्रवास देखील यातून होणार आहे

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध