Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

दहिवद येथील सन २०१८ साली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लावलेल्या जिवंत झाडांची पाण्याअभावी कत्तल.



दहिवद येथील सन २०१८ साली  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत लावलेल्या जिवंत झाडांची पाण्याअभावी कत्तल.


अमळनेर प्रतिनिधी : महात्मा गांधी रोजगार हमी कायद्याअंतर्गत सन २०१८ साली दहिवद ता.अमळनेर येथे गायरान जमिनीवर १००८ झाडे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या उपस्थितीत लावण्यात आली होती .

महात्मा गांधी रोजगार हमी कायद्या अंतर्गत लावलेली झाडे आज रोजी दहा ते पंधरा फुट उंचीची झाली आहेत. योजनेंतर्गत त्या झाडांचे केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीने तीन वर्षापर्यंत संगोपन करण्यात आले.सन २०१८ ते २०२१ पर्यंत केंद्र शासनाच्या निधीतून त्या झाडांचे संगोपन केल्यानंतर ग्रामपंचायत दहिवद यांच्याकडेस ते संगोपणासाठी देण्यात आले.२०२१ पासून आजपर्यंत ग्रामपंचायत दहिवद यांनी त्या झाडांकडे लक्ष न दिल्यामुळे आज ती झाडे पाण्याअभावी शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यामुळे केंद्र शासनाचा पैसा वाया जाण्याची परिस्थितीती निर्माण झाली असून याला जबाबदार कोण ? याला जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत सचिव यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर व उपासमारी रोखण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरु करण्यात आली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील गरजू व गरीब लोकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होता.योजनेत गरजू व गरीब कुटुंबाना तीन वर्षासाठी रोजगार देण्यात येतो.तीन वर्षासाठी प्रत्येकी कुटुंबाला ५० झाडांचे संगोपन करायला देण्यात येते.तीन वर्षानंतर त्या झाडांचे संगोपन,देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची असते व तीच जबाबदारी ग्रामपंचायत दहिवद यांनी नाकारली असल्याने आज ती झाडे पाण्याअभावी शेवटची घटका मोजत आहेत.पर्यावरण पूरक गावामध्ये चाललेला हा खेळ कदाचित प्रशासनाचा लक्षात आलेला दिसून येत नाही.

आमचे प्रतिनिधी यांनी अमळनेर गटविकास अधिकारी विशाल.के.शिंदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी झाडांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत दहिवद सरपंच व ग्रामसेवक यांची आहे.

पाण्याअभावी झाडांचे नुकसान झाल्यास रोजगार हमी कायद्यांतर्गत दोषींवर गुन्हे दाखल करून झालेल्या नुकसानाचे रितसर पंचनामे करून शासन नियमानुसार नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल असे सांगण्यात आले .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध