Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० एप्रिल, २०२३

मोटर सायकल चोर तालुका पोलिसांच्या जाळ्यात

शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने तालुका पोलीस स्टेशन मधील दाखल गुन्ह्यात मोटरसायकल चोरास अटक करून चोरीची मोटरसायकल हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे.

दिनांक १९/०४/२०२३ रोजी रात्री २३.२३ वाजता पोस्टेला फिर्यादी नामे समीर आवण पावरा वय २३ वर्षे रा. कोडीद ता.शिरपूर जि.धुळे यांनी फिर्याद दिल्याने गुरन ८२/२०२३ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा   दाखल झाला होता.

सदर गुन्हयातील फिर्यादी यांची नविन मो.सा.पासिंग न झालेली एच एफ डिलक्स मो.सा दिनांक १७/०४/२०२३ रोजी दुपारी १४.०० वाजेचे सुमारास कोडीद गांवाचे बस स्टॅन्डवरुन चोरीस गेली होती.यातिल फिर्यादी यांनी सदर मो.सा.चा शोध घेताला परंतू ती न मिळून आल्याने यातिल फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाल्याने रात्री नाकाबंदी दरम्यान सदर मो.सा. चा शोध घेणे बाबत अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवून हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे दिनांक २०/०४/२०२३ रोजी ०२:३४ वाजता नाकाबंदी करुन वाहन तपासणी करीत असतांना एक इसम एका नव्या मो.सा. वर आल्याने त्यास सदर मो.सा.बाबत विचारपूस करता तो उडवा उडवीचे उत्तरे देत असलयाने त्यांचेवर संशय आल्याने चोरीस गेलेली मो.सा.चे वर्णन व सदर इसमाजवळ मिळालेली मो.सा.चे वर्णन एकच असल्याने सदर इसमास व मो.सा.ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने सदर मो.सा.कोडीद बस स्टॅन्डवरुन चोरी केल्याचे कबूल केले आहे.सदर गुन्हयात राहूल उर्फ रविंद्र विश्वसा कोकणी वय २१ वर्षे रा.कोडीद ह.मु. सुळे ता.शिरपूर जि.धुळे यांस सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास पोना / १२८९ एस ए चव्हाण हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.संजय बारकूंड सो,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे सो.व पोलीस निरिक्षक श्री अंसाराम आगरकर अति.कार्यभार उपविभागिय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांचे मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस स्टेशनचे सपोनि श्री सुरेश शिरसाठ, पोसई / संदीप पाटील, पोहेकॉ / २३८ पवार पोहेकॉ / ५७८ खसावद, पोहेकॉ / ५३९ पवार, पोना/ ९४६ पवार, पोना / ७२२ चौधरी, पोना/ १२८९ चव्हाण, पोना/९०५ शिंदे, पोकों/ १४५२ कुंवर, पोकॉ/५४१ नेरकर अश्यांनी नाकाबंदी करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध