Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला महाराष्ट्र शासन शहर सौंदर्यीकरण अभियानात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक, 15 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला महाराष्ट्र शासन शहर सौंदर्यीकरण अभियानात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक, 15 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला महाराष्ट्र शासन शहर सौंदर्यीकरण अभियानात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून 15 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागामार्फत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थां मध्ये शहर सौंदर्यीकरण अभियान हाती घेण्यात आले होते. त्या अनुषंगाने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने यात सहभाग घेतला होता. यानुसार शिरपूर नगरपरिषदेकडे असलेले सुंदर जलाशय (मुकेश पटेल रिक्रेशन गार्डन मधील तलाव), शहरातील स्वच्छ व सुंदर रस्ते, सुंदर हरित पट्टे, सुंदर पर्यटन स्थळे आणि सुंदर व्यापारी संकुल असे निकष ठरविण्यात आले होते.
यात शिरपूर वरवाडे नगरपरिषदे तर्फे शिरपूर शहरात शहर सौंदर्यीकरण यावर भर देण्यात आला होता. याची फलनिष्पत्ती म्हणजे शिरपूर नगरपरिषदेने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा-२०२२ मध्ये "अ व ब वर्ग" नगरपरिषदेतून महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच शिरपूर नगरपरिषदेची मालमत्ता वसुलीची परंपरा कायम ठेऊन यावर्षी देखील विक्रमी ९२.७२ टक्के वसुली केल्याबाबदल महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला. यासह दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY- NULM) मध्ये पथ विक्रेता सर्वेक्षण यात देखील प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुंबई एन. सी. पी. ए., नरिमन पॉईंट येथे 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिरपूर वरवाडे नगरपरिषेदेचे प्रभारी मुख्याधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.), प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांकाचे दोन बक्षिसे मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे विशेष कौतुक केले.
माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी नगरपरिषदेच्या सन्मानाबाबत कौतुक केले व यापुढे शिरपूर शहरात शहर सौदर्यींकरण अधिकाधिक भर देण्यात येईल असे स्पष्ट केले. शिरपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
शिरपूर वरवाडे नगरपरिषेदेचे प्रभारी मुख्याधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.), प्रशासक तथा प्रांताधिकारी प्रमोद भामरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, उपमुख्य अधिकारी कल्याणी लाडे, उद्यान पर्यवेक्षक सागर कुळकर्णी,आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, शहर समन्वयक दिव्या तोरीस यांनी प्रयत्न केले.
यासाठी घरपट्टी विभाग प्रमुख कैलास चौधरी, वसुली कर्मचारी तसेच शहर प्रकल्प अधिकारी भगवान भामरे, समुदाय संघटक प्रमोद अहिरे व नागेश पुंडगे यांनीही परिश्रम घेतले. याबद्दल सर्व नगरपरिषदेचे सर्व माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आतापर्यंत शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला प्राप्त झालेले बहुमान :
आमदार अमरिशभाई पटेल हे तत्कालीन शिक्षण मंत्री असताना व भूपेशभाई पटेल नगराध्यक्ष असताना सन 2003 पासून आजपर्यंत सातत्याने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला पुरस्कार प्राप्त होत असल्याची बाब गौरवपूर्ण आहे.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष सौ. जयश्रीबेन पटेल, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या विकासात फार मोठे योगदान असल्याने शिरपूरकर जनता पटेल परिवाराला मनापासून धन्यवाद देत आहे.
१) संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राज्यात प्रथम (सन २००२-०३),
२) संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान अंतर्गत सन २००३-०४ मध्ये पाणीपुरवठा व व्यस्थापन अंतर्गत उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पारितोषिक,
३) संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान राज्यात प्रथम सन २००५-०६,
४) नगर विकास दिनानिमित्त महाराष्ट्रातील उत्कृष्ठ नगरपालिका म्हणून ३ कोटीचे बक्षिस (सन २०१६-१७),
५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वसुंधरा पुरस्कार महाराष्ट्रात प्रथम सन (२०१७-१८),
६) सन २०१६ ओ.डी.एफ. शहर १.५० कोटी चे अनुदान,
७) स्वच्छ सर्वेक्षण - २०१९ नाशिक विभागात प्रथम (वेस्ट झोन मध्ये ३९ वा व भारतात ४९ वा क्रमांक),
८) २०२० मध्ये पश्चिम विभागात ६ वा व देशात ४२ वा क्रमांक
९) नवी दिल्ली येथे थ्री स्टार मानांकन (सन 2021).
शिरपूर वरवाडे नगरपरिषदेला महाराष्ट्र शासन शहर सौंदर्यीकरण अभियानात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक,
15 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा