Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा,धुळेचा पथकाने पकडला लाखोंचा बेकायदेशीर दारू व बिअरचा साठा.
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखा,धुळेचा पथकाने पकडला लाखोंचा बेकायदेशीर दारू व बिअरचा साठा.
आज रोजी दिनांक 20/04/2023 रोजी पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आयशर ट्रक क्र.UP-८०-FT-९३९८ या वाहनामध्ये बेकायदेशिररित्या विदेशी दारुचे खोके भरुन सदरचे वाहन हे आर्वी-धुळे मार्गे सुरतकडे जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यावरुन मा. पोलीस अधीक्षक धुळे व मा अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शन व सुचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अवधानफाटा येथे रोडवर थांबून आर्वीकडुन धुळेकडे येणारी वाहने चेक करत असताना आयशर ट्रक क्र. UP-८०-FT- ९३९८ हे धुळे कडे जात असल्याचे दिसल्याने अडथळा करुन थांबविले. ट्रक वरील चालक व क्लिनर यांना नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) अर्जुन रामजीत बिंद वय २४ व्यवसाय चालक रा.शेखाही पोस्ट अधनपुर तह. शाहगंज जि.जोनपुर (उत्तरप्रदेश) २) सोमनाथ नाना कोळी वय २६ व्यवसाय क्लिनर रा.खामखेडा ता. शिरपुर जि.धुळे असे असल्याचे सांगितले, दोघांना ट्रक मधील माला बाबत विचारपूस केली असता त्यांनी ट्रक मध्ये सॅनीटरी पॅड असल्याचे सांगून त्याबाबत मालाची बनावट बिल्टी हजर केली. तथापी सदर ट्रक मध्ये बेकायदेशीर दारू साठा असल्याचा दाट संशयावरून सदर ट्रक व सदर दोन इसमांना ताब्यात घेवून पोलीस अधिक्षक कार्यालय, धुळे येथे आणून ट्रक मधील माला बाबत खात्री केली असता सदर ट्रक मध्ये पाठी मागील साईडला सॅनीटरी पॅडच्या गोण्या भरल्याचे व समोरील बाजुस दारू व बिअरचे बॉक्स मिळून आले. त्याचे वर्णन खालील प्रमाणे. २०५ खोके त्यात
१) ७,८१,८००/-रु.किंमतीची देशी/विदेशी विविध कंपनीची व्हिक्सी दारुचे चे एकुण एकुण ६८०४ नग वॉटल,
२) ४०,८०० /- रु. कि.ची TUBORG PREMIUM BEER STRONG चे २० बॉक्स त्यात ८४० बॉटल
३) १०,००,०००/-रु.कि. चा आयशर ट्रक क्र. UP-C०-FT-९३९८ जु.वा. किं.अ.
४) १२,०००/-कि. चे सॅनिटरी पॅड चे पांढर्या रंगाच्या १२० गोणी प्रत्येकी किंमत १००/- रु. प्रमाणे ५) १०,०००/- रुपये किमतीचे २ मोबाईल,
असा एकुण ८,२२,६००/- रु. किमतीची दारू व ईतर मुद्देमालासह एकुण किंमत १८,४४,६००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरूध्द मोहाडीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालू आहे. तसेच आरोपीने सदरचा माल कोठून आणला व डिलेवरी कोठे देणार होता या चेन मध्ये आणखी कोण आरोपी आहेत या बाबत विचारपूस चालू आहे.
सदरची कारवाई श्री. संजय बारकुंड, पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे. यांचे मार्गदर्शनाखाली स्था.गु.अ.शा.चे पो.नि. श्री. हेमंत पाटील, पोसई/बाळासाहेब सूर्यवंशी, असई/संजय पाटील, पोहेकॉ संतोष हिरे, पोना/पंकज खैरमोडे, पोशि/महेंद्र सपकाळ, योगेश जगताप, किशोर पाटील अशांनी केली आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा