Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

धुळे दादर रेल्वेचे मंत्री रावसाहेब दानवे व माझी मंत्री खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवत उद्घाटन करण्यात आले .....!!



धुळे - धुळे व दादर एक्सप्रेस रेल्वेचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे )व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते हिरवी झेंडे दाखवत उद्घाटन करण्यात आले आहे. धुळ्यातील रेल्वे स्थानकावर सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम संपन्न झाला. बहुप्रतिक्षित असणारी धुळे व दादर रेल्वे सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाच्या काळात ही रेल्वे बंद झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. अनेक अडचणींचा सामना करत नागरिकांना मुंबई गाठावे लागत होते.नागरिकांची गैरसोय दूर होण्यासाठी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी रेल्वे मंत्रालयाकडून वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांच्या मागणीला यश प्राप्त झाले असून आज धुळे व दादर रेल्वेचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खा. डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आले आहे.
याप्रसंगी खा. डॉ. सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर प्रतिभा चौधरी, रेल्वेचे डीआरएम एस एस केडिया, सी डी सी एम डॉ .शिवराज मानसपुरे, शंखधन कृष्णचंद्र यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व रेल्वेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध