Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ एप्रिल, २०२३

खान्देशातील शेतकऱ्यांनी विविध विषयांवर घेतली शेतकरी मित्र बिंदु शर्मा यांची भेट.शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे मांडल्या आपल्या व्यथा



राज्यात झालेला बेमुसमी पाऊस गारपीट शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे कांदा,गहू,हरभरा,तसेच भाजीपाला,फळबाग या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालाय मात्र राज्य सरकारने निव्वळ शेतकऱ्यांना आश्वासन देऊन त्यांचे आसू पुसण्याचे काम केलं आहे गेला एक महिना उलटून देखील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रत्यक्षात कुठलीही मदत मिळालेली नाही गेल्या महिनाभरापूर्वी राज्याच्या कृषिमंत्री माननीय अब्दुल सत्तार साहेब हे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन गेलेत मात्र निव्वळ आश्वासनांचा महापुरात लोहाळे ही वाहत नाहीत या उक्तीप्रमाणे शेतकऱ्यांची थट्टा झाल्याचे साक्री तालुक्यातील सिंदबन छवडेल कोरडे येथील शेतकऱ्यांचे निदर्शनास आले आहे तसेच राज्य शासनाने कांदा अनुदान 2023 मुदतवाढ करून त्याला लाल उन्हाळी रांगडा या सर्व बाजार समितीत आलेला माल सरसकट अनुदानास पात्र करावा यासाठी राज्यस्तरावर भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र उप प्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांच्याकडून राज्य सरकारला निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या वतीने कळविले सध्या कांद्याचे दर कोसळल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे कांद्यासह इतर शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासन स्तरावर योग्य नियोजन होणे गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या वतीने श्री शर्मा यांनी आपले मत व्यक्त केले तसेच आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर म्हणजेच शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या नाफेड संदर्भातील काही अडचणी असतील तसेच जिल्हाधिकारी धुळे यांना भेटून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यावर योग्य ते मार्ग काढण्यावर बिंदू शेठ शर्मा यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे सांगितले तसेच पिंपळनेर, सामोडे,कातरवेल,नामपूर,ताराबाद,व तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या भाजपा सरकारने शेती क्षेत्राला न्याय देण्याचे काम येणाऱ्या काळात करेल ते आश्वासन यावेळी भाजप किसान मोर्चाचे महाराष्ट्र उप प्रदेशाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा यांनी दिले आहे.


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध