Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ एप्रिल, २०२३
अखेर ठरले शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा २२ एप्रिलला नंदूरबार येथे येणार
नंदुरबार प्रतिनिधी:-माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे शिव महापुराण कथाकार पं.प्रदीप मिश्रा यांची भेट घेतली.
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना वेळेत व तात्काळ उपचार मिळावेत तसेच पुणे,मुंबई,नाशिक सारख्या मोठ्या शहरांप्रमाणेच रुग्णांना अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील बायपास रस्त्यावर छत्रपती मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यात आले असून, बांधकाम पूर्ण करण्यात आलेले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 22 एप्रिल रोजी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व उद्योजक मनोज रघुवंशी यांनी आज सिहोर येथे श्री विठ्ठलेश सेवा समितीचे शिव महापुराण कथाकार पं.पंडित मिश्रा यांची भेट घेतली.उद्घाटनाचे निमंत्रण पंडित मिश्रा यांनी स्वीकारले.यावेळी पंडित मिश्रा यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, उद्योजक मनोज रघुवंशी,योगी रघुवंशी, माजी नगरसेवक दीपक दिघे यांच्या गमछा देऊन सत्कार केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा