Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ एप्रिल, २०२३

धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे डी.बी.पथकाची दमदार कामगिरी



२ तरूणांकडुन ११ तलवारी,२ मोबाईल व मो.सा. असा एकुण १,०३,०००/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त 

शिरपूर /प्रतिनिधी शिरपूर शहर पो.स्टे. चे पोनि अन्साराम आगरकर यांना दि. १३ एप्रिल २०२३ रोजी रात्री ११.३० वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, शिरपूर फाटा येथे दोन इसम लाल रंगाचे फॅशन प्रो मोटार सायकल क्र.एम.एच.१८ ए.यु. ९५०२ हिचेने येत असुन त्यांचेकडे तलवार असल्याबाबत बातमी मिळाली.सदर इसमांना पकडुन त्यांचेवर कारवाई करणे बाबत डी.बी.पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील यांना आदेश केले.

त्यानुसार पोहेकॉ ललीत पाटील यांनी दोन पंच व डी.बी.पथकाचे अंमलदारांसह शिरपूर फाटा येथे सापळा लावुन लाल रंगाची फॅशन प्रो मो.सा. क्र.एम.एच.१८ ए.यु.९५०२ हिचेने येणारे रोहित राजेंद्र गिरासे वय २४ व मनीष ओंकार गिरासे वय १९ दोन्ही रा. अहिल्यापूर ता. शिरपूर जि.धुळे यांना पंर्चासमक्ष १२.४५ वाजता छापा टाकुन शिताफिने पकडले.तेव्हा त्यांचे मो.सा.चे उजव्या बाजुस सीट लगत प्लास्टीक कागदात एक तलवार दोरीने बांधलेली मिळुन आल्याने त्यांचेकडे आणखी किती तलवारी असुन त्या कोठे ठेवल्या याबाबत त्यांना विचारपूस करता रोहित गिरासे याने तो काम करीत असलेल्या गॅरेजमध्ये आणखी तलवारी ठेवल्याचे सांगुन त्याने आमोदे ता. शिरपूर शिवारातील शिरपूर फाट्यावरील बालाजी ऑटो पार्ट्स नावाने असलेल्या मोटार गॅरेजचे निकामी स्पेअर स्पार्ट्सचे आडोशास पांढरे रंगाची प्लास्टीक गोणीत ठेवलेल्या एकुण १० तलवारी पंचांसमक्ष काढुन दील्याने एकुण ११ तलवारी,२मोबाईल व मो.सा.सह असा एकुण १,०३,०००/- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांचेविरूध्द पोकों/सचिन वाघ ज्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. पोसई गणेश कुटे, पोसई संदिप मुरकुटे डी. बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील,विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रविण गोसावी, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, भटु साळुंके तसच होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, शरद पारधी व राम भिल यांनी ही कारवाई केली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध