Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ एप्रिल, २०२३

दिव्यांग भगिनी मंजुराताई हिला टोकरे कोळी युवा मंचद्वारे व्हीलचेअर सुपूर्द


        
शिरपूर प्रतिनिधी:- मंजूरा सजन कोळी, रा.भरवाडे ता.शिरपूर,जि.धुळे ही जन्मतःच दिव्यांग असून स्वावलंबी आहे.त्यांच्या स्वावलंबनाला गती देण्यासाठी डॉ.राजेश कोळी साहेब (कान,नाक,घसा तज्ञ,नंदुरबार) यांच्या वाढदिवसानिमित्त व्हीलचेअर भेट देण्यात आली.
       
दिव्यांग मंजूराताई विषयी डॉ.राजेश कोळी साहेब यांना नितीनभाऊ कोळी यांनी त्याच्या स्वावलंबनाविषयी सविस्तर माहिती देवून शिवणकाम करून स्वतःचा व वृद्ध आईचा कसा सांभाळ करते याबद्दल सांगितले. डॉक्टर साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता व्हीलचेअर उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे मनःपूर्वक आभार!
       
दि.12 एप्रिल रोजी मंजूराताई यांना व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आली. या व्हीलचेअरने त्यांचा शिवणकाम व्यवसायाला नक्कीच गती मिळेल आणि त्यामुळे त्यांचा हाताला जास्त काम मिळाल्याने दोन पैसे जास्त मिळतील. तसेच त्यांचे शारीरिक श्रम कमी होण्यास मदत होईल. अशी प्रार्थना करू या.व्हीलचेअर सुपूर्द करतेवेळी नितिनभाऊ कोळी, मयुरेश ठाकरे, विकास कोळी, सुरेश कोळी,भागाबाई कोळी, पुंजाबाई कोळी आणि दिव्यांग मंजूराताईचे कुटुंब उपस्थित होते.

टोकरे कोळी युवा मंच, महाराष्ट्र राज्य



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध