Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ एप्रिल, २०२३

शिरपूर शहर पोलिसांनी का थांबवला लग्न सोहळा ? तालुक्यातील करवंद गावात होणार होता.....विवाह



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुक्यातील करवंद गावात मंगळवारी होत असलेला बालविवाह विवाहाच्या काही तासाअगोदर शिरपुर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी नवरदेव नवरीच्या आई-वडिलांना समज देत समुपदेशन करून बालविवाह रोखला आहे.

शिंदखेडा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह शिरपुर तालुक्यातील करवंद येथील मुलाशी मंगळवारी 18 एप्रिल 2023 रोजी दुपारी करवंद गावात होणार होता.नियोजित विवाहातील नववधू ही अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी पथक तैनात करून पोहेकॉ अनिल जाधव,पोना पंकज पाटील,पोकॉ विवेक जाधव, महिला पोलीस पूजा सारसर आदींनी घटनास्थळी दाखल होत चौकशी करून वधू अल्पवयीन असल्याचे निदर्शनात येताच नातेवाईकांना समज देत वधू व वरास शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

यावेळी पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी बालविवाह विषयक कायदे, आरोग्य आणि बालविवाहचे दुष्परिणाम आदींबाबत माहिती देत समुपदेशन केले.वधू व वर आणि त्यांच्या आईवडिलांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे लेखीपत्र लिहून देत सदर नियोजित विवाह थांबविला.त्यामुळे नागरिकांच्या सतर्कतेने होणार बाल विवाह रोखण्यास शहर पोलिसांना यश आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध