Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ एप्रिल, २०२३

साक्री तालुक्यात मौजे भाडणे येथे स्मार्ट कृषी प्रकल्प अंतर्गत कांदा पिकाची शेती कार्यशाळाचे आयोजन कृषी विभागाकडून करण्यात आले



साक्री तालुक्यातील मोजे.भांडणे.तालुका.साक्री.येथे मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पा अंतर्गत मौजे.भांडणे येथे कृषी विभाग साक्री कृषी सहाय्यक श्री.जे .बी.पगारे यांनी कांदा पिकाविषयी शेतीशाळा त शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.


या शेतीशाळेत माननीय. विनयजी बोरसे. प्रकल्प संचालक आत्मा धुळे .यांनी शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष सण 2023.या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. माननीय जी. के. चौधरी. नोडल अधिकारी उपसंचालक स्मार्ट धुळे .यांनी स्मार्ट प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून राबवण्यात येत असलेल्या माननीय .बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पाचे उद्दिष्ट खालील प्रमाणे राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि कृषी उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून स्पर्धात्मक व सर्वसमावेशक कृषी मूल्य साखळी विकसित करणे. मुल्यसाखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्याची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय.


कांदा पिकाची शेती शाळा मध्ये माननीय रोहित जी कडू शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र धुळे. यांनी कांदा पिकाविषयी हवामान, जमीन पूर्व मशागत ,लागवड हंगाम, कोणते वाण वापरावे, बियाणाचे प्रमाण, लागवड, खते व पाणी व्यवस्थापन आंतरमशागत, रोग कीड व उपाय याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
पांजरा कान फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रो. पा. भाडणे या शेतकऱ्यांची कंपनी विषयी श्री जयेश शिरीष सोनवणे यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या सभासदांना माहिती दिली.
या शेती शाळेत आलेल्या शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे देण्यात आले होते. व त्यासोबत खत व्यवस्थापन करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
या शेती शाळेत भांडणे गावातील शेतकरी श्री मुकेश गुलाबराव सोनवणे, सुरेश काशिनाथ देसले, खंडेराव नथू सोनवणे, श्रीपत सखाराम देसले ,भरत आनंदा पाटील, जगदीश गबाजी सोनवणे, प्रवीण दशरथ सोनवणे, हेमंत काशिनाथ देसले, योगेश सुभाष साळुंखे , वसंत दामोदर सोनवणे, शिरीष आनंदराव सोनवणे, किरण जयवंत पाटील, भास्कर काशिनाथ देसले, जयेश सोनवणे.  अशा प्रकारे गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव उपस्थित होते. या कांदा पिकाच्या शेती शाळेला श्री एस .बी. शिंदे मंडळ कृषी अधिकारी साक्री व श्री सि.के. ठाकरे तालुका कृषी अधिकारी साक्री यांनी मार्गदर्शन केले

तरून गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध