Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ एप्रिल, २०२३

प्रा.देवेंद्र पवार यांची प्राचार्य पदी नियुक्ती.



शिंदखेडा प्रतिनिधी:- बेटावद येथील जनता शिक्षण प्रसारक संस्थेचे,श्री फ मु ललवाणी माध्यमिक व डॉ दादासाहेब श्री तू गुजर उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि १ एप्रिल रोजी विद्यालयातील वरिष्ठ जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक देवेंद्र गंभीरराव पवार यांची प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच उपमुख्याध्यापक पदी कैलास पाटील व पर्यवेक्षक पदी प्रविण माळी यांची निवड करण्यात आली आहे.

त्यांना संस्थेचे अध्यक्ष अशोक गुजर,
सचिव डॉ श्रीकृष्ण वाणी,कोषाध्यक्ष भालचंद्र पाठक,संचालक सुभाषचंद्र चोरडिया, चंद्रकांत पाटील,रामचंद्र गुजराथी,प्रकाश महाजन, मंगला वाणी तसेच मावळते प्राचार्य वाय डी चाचरे आदींनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक बंधु-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध