Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

शिरपूर शहर पो.स्टे.चे डी.बी.पथकाची कामगिरी...बांधकाम साहित्याच्या चोरी करणाऱ्या चोरांचा शिताफिने घेतला शोध..



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने दाखल गुन्ह्यातील बांधकाम साहित्याच्या चोरी करणाऱ्या चोरांच्या मोठ्या सीताफिने शोध घेऊन मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे. ०२ चोरट्यांकडून १२,५००/- रू. कि. च्या लोखंडी सळई माल व टाटा एस कंपनीचे टेम्पो वाहनासह एकुण ३,१२,५००/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त जप्त करून गुन्हा दाखल करत कारवाई केले आहे.

शिरपूर शहर पो.स्टे. मधील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी अनिल खंडसिंग राजपूत वय – ५१ व्यवसाय शेती रा. रथ गुल्ली, शिरपूर ता. शिरपूर जि.धुळे यांनी फिर्याद दिली की,आमोदे ता.शिरपूर जि.धुळे शिवारातील प्लॉट नं. १५-अ, १५-व येथे फिर्यादीचे घर बांधण्याचे काम सुरु असतांना त्यांनी बांधकामाच साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड बनवून त्यात लोखंडी सळ्या सिमेंट व इतर बांधकामाचे साहित्य ठेवलेले असतांना दि.२२/०४/२०२३ रोजीचे सायं. ७.०० ते दि. १३/०४/२०२३ रोजीचे सकाळी ६.०० वाजेचे सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे बांधकामाचे साहित्य ठेवलेल्या पत्र्याचे शेडचा मागील बाजुने पत्रा उचकावून शेडचे आत प्रवेश करून शेडमधून ४०,०००/- रू. कि. च्या ८ भारी लोखंडी सळ्या त्यात ८.१०/ व १२ एम.एम.च्या.५,०००/- रू. कि. चे लोखंडी सळ्या कापण्याचे लहान मशीन व ३,०००/- रू.कि.चे भारजा गंस कंपनीचे स सिलेंडर असा माल चोरून नेले आहे.

सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर शिरपूर शहर पो.स्टे.यानी डी.बी. पथकाचे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने तपासचक्रे फिरवून गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढली असता फिर्यादीचे बांधकामाचे ठिकाणी वॉचमन म्हणून काम करणारा अविनाश सुरेश मालचे रा.आमोदे ता शिरपूर जि. धुळे याने सदरचा गुन्हा केला आहे. त्यावरून डी.बी.पथकाचे अंमलदारांनी वॉचमन अविनाश सुरेश मालचे याचा शोध घेतला असता तो आमोदे गावात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस करता त्याने त्याचे साथीदारांसह सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देवून चोरीचा माल पंकज मंगल भिल याचे निळ्या रंगाचे टेम्पो क्र. एम.एच. ०१/ बी.आर.०५८८ मध्ये भरून नेला असल्याचे सांगीतले.
त्यावरून पंकज भिल याचा शोध घेतला असता तो आमोदे गावात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्याने चोरीचा माल व टेम्पो दाखविल्याने एकूण १२,५००/- रू.किं.च्या अडीच भारी लोखंडी सळ्या त्यात ८,१० व १२ एम.एम.च्या तसेच ३,००,०००/- रू. कि.चा निळ्या रंगाचा टाटा एस कंपनीचा टेम्पो क्र.एम.एच.०१/बी.आर.०५८८ सह एकुण ३,१२,५००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) अविनाश सुरेश मालचे वय १९ व २) पंकज मंगल भिल वय- २२ दोन्ही रा. आमोदे ता. शिरपूर जि. धुळे यांना अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता ०१ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पो.नि आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोना/मनोज पाटील व डी. बी. पथक करीत असून सदर गुन्ह्यात आणखी इतर आरोपी निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर.डी.बी.पथकाचे पोहेकॉ / ललीत पाटील, लादूराम चौधरी, पोना/मनोज पाटील,पोका/विनोद आखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रविण गोसावी, सचिन वाघ,भटू साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार,राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध