Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ एप्रिल, २०२३

रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांचे आश्वासना नुसार मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्सप्रेस रेल्वे ३० जुनपर्यंत धावणार,धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी यशस्वी...



शिरपूर प्रतिनिधी :- प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे भुसावळ ते मुंबई सेंट्रल प्रवाशी रेल्वे प्रवाशांच्या सोईसाठी ११ जानेवारी पासुन ३१ मार्चपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली होती.परंतु सदर प्रवाशी गाडी ३१ मार्च पासून बंद होणार होती यासाठी रेल्वेमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांचाकडे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी (दि.१८ मार्च) रोजी भोकरदन येथे भेट घेवुन निवेदन देवुन वरील मागणी केली होती.रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी मुंबई सेंट्रल- भुसावळ एक्सप्रेस रेल्वे दि. ३१ मार्च नंतर कायम करण्यात येणार असल्याचे यावेळी आश्वासन दिले होते. त्यानुसार आता मुंबई सेंट्रल- भुसावल एक्सप्रेस हि रेल्वे ३० जुनपर्यंत नियमित धावणार आहे. रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचे आश्वासनानुसार मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्सप्रेस रेल्वे ३० जुनपर्यंत धावणार असल्याने धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणीला यश आले आहे. 

या रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळत आहे तरी आपण प्रवाशांची भावना लक्षात घेवुन मुंबई सेंट्रल-भुसावल एक्सप्रेस हि रेल्वे कायम करावी असा पाठपुरावा करुन सदर गाडीचे उत्पन्न व प्रवाशांच्या उदंड प्रतिसाद रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांचा निदर्शनास धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी आणुन दिला होता.त्यानुसार आता भुसावळ ते मुंबई सेंट्रल प्रवाशी हि प्रवाशी रेल्वे पुन्हा ३० जुनपावेतो प्रायोगिक तत्त्वावर धावणार असुन रेल्वे प्रशासनाचे नविन वर्षाचे वेळापत्रक जुलैपासून सुरू होण्या अगोदर सदर रेल्वे नियमीत होईल असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. 

रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचे आश्वासना नुसार मुंबई सेंट्रल-भुसावळ एक्सप्रेस रेल्वे ३० जुनपर्यंत धावणार आहे यामुळे धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांची मागणी यशस्वी झाली आहे. तरी मुंबई सेंट्रल- भुसावळ एक्सप्रेस रेल्वेच्या प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध