Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ एप्रिल, २०२३

शिरपूर शहर पो.स्टे.शोध पथकाची कामगीरी...बियरच्या साठा असलेलली कार सह ०५,०९,६००/- रु.किं.मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश....



शिरपूर प्रतिनिधी :– शिरपूर शहर पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापडा रचून कारवाई केली असता बियरच्या साठा असलेला माल व कार सह ०५,०९,६००/- रु. किं.मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.

शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. इंदौरकडून नरडाणाकडे मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार क्र.एम.एच.०३ / डी.जी.९०५१ या वाहनाने एक इसम विदेशी दारूची चोरटी वाहतूक करीत आहे.

त्यावरून शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शिरपुर टोलनाका येथे दोन पंचांसमक्ष सापळा लावला असता मुंबई-आग्रा महामार्ग क्र.३ वर इंदौरकडुन शिरपुर टोलनाक्याचे दिशेने मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार क्र.एम.एच. ०३/ डी.जी.९०५१ येतांना दिसल्याने सदरचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत असतांना कार चालकाने कारवाई टाळण्यासाठी त्याचे वाहन मागे घेत असतांना समोरुन येणारे वाहनास त्याने मागुन जोराने धडक देवून तो शिरपुर फाटयाचे दिशेने त्याचे वाहन वळवित असतांना त्यास २१.१५ वाजेचे सुमारास छापा टाकुन पकडले. तेव्हा त्याचे कारची डिक्की दाबून तिचे नुकसान झालेले दिसले.
 
वरील कारची झडती घेता तिचे डिक्कीमध्ये ०९,६००/- रु.कि.चे एकुण ०६ खोके त्यात हायवर्डस् कंपनीची प्रिमीयर स्ट्रॉंग बिअर २००० च्या ६५० मि.ली.च्या एकुण ७२ काचेच्या बाटल्या पैकी ०८ काचेच्या बाटल्या फुटलेल्या असा माल मिळुन आल्याने सदर मालासह ०५,००,०००/- रु. कि.ची मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार क्र.एम.एच. ०३/ डी. जी.९०५१ असा एकुण ०५,०९,६००/- रु. किं.च्या मुद्देमालासह इसम नामे- सुभाष करचन पावरा रा.अमरीश नगर पो.आंबा ता. शिरपुर जि.धुळे यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द पोका भट्ट राजेंद्र साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपुर शहर पो.स्टे.ला मुं.प्रो.अॅक्ट कलम ६५ (अ), ६५ (ई), ८० (१) (२) सह भादवि कलम २७९, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री.ए.एस.आगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ / ललीत पाटील करीत आहेत.
 
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग शिरपुर, पोउनि / संदीप मुरकूटे, पोहेकॉ / ललित पाटील, पोकों/ गोविद कोळी, विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, भूषण कोळी व भटु साळुंखे अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध