Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ एप्रिल, २०२३

शिरपुर शहर पो.स्टे.अधिकारी व करवंद बिट अमलदार यांची कामगीरी... दोन संशयतांकडून चोरीच्या मोटरसायकली जप्त...!



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरी बाबत दाखल झालेल्या गुन्ह्याच्या उकल करून सराईत संशोधन कडून चोरीच्या ४० हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करत दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिरपुर शहर पोलीस स्टेशन गुरन ०१५२ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यात दिनांक ०९/०४/२०२३ रोजी रात्री २१.३० ते २२.३० वाजेच्या सुमारास शिरपुर शहरातील मांडळ शिवारातील हॉटेल फॉजी समोर फिर्यादी धिरेंद्र प्रतापसींग प्रेमसिंग माला वय ३४ वर्ष व्यवसाय शेअर मार्केटींग रा. प्लॉट नं. १७ पद्मावती नगर, मांडळ शिवा शिरपुर जि. धुळे यांनी दिनांक ०९/०४/२०२३ रोजी रात्री २१.३० वाजेच्या सुमारास हॉटेल फौजी समोर त्यांची मो. सायकल क्र. MH-१८-BQ – ७४३५ २५,०००/- रुपये किमतीची ही लावून हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले व परत रात्र २२.३० वाजेच्या सुमारास मो.सायकल लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना त्यांची मो.सा. ही दिसून आली नाही म्हणुन त्यांनी दिलेल्या तक्रारी वरुन दिनांक १५/०४/२०२३ रोजी १५.१७ वाजता गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचे तपासकामी पोलीस निरीक्षक श्री ए.एस.आगरकर शिरपुर शहर पो.स्टे यांनी पीना / ६१८ पंकज पी.पाटील यांना सदर गुन्ह्याचा पुढील तपास दिला त्यावरुन पोलीस अधिकारी व करवंद बिट अमलदार यांनी तपास च फिरवुन दिनांक १९/०४/२०२३ रोजी मांडळ शिवारात दोन इसमांना मो.सा.क्र.MH १५- EZ-५८८२ सह संशयीत रिल्प) ताब्यात घेण्यात आले. त्यांना अधिक विचारपुस करता त्यांचे जवळ मिळुन आलेली मो.सा.क्र.MH १५- EZ-५८८२ थाळनेर पोलीस स्टेशन गुरन ००४९/२०२३ भादवि कमल ३७९ प्रमाणे मधील चोरीस गेलेली मो.सायकल १५,०००/- रुपये किंमतीची असले बाबत त्यांनी कबुली दिली.त्यानंतर त्यांना अटक करुन अधिक विचारपुस केली असता त्यांन सदर गुन्ह्यातील गेला माल मो. सायकल क्र.MH-१८-BQ- ७४३५ ही काढून दिल्याने ते हस्तगत करून उल्लेखनीय कामगीरी केली आहे.

सदर कामगीरी मा.पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुंड,मा.अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे,यांच मार्गदर्शना खाली श्री ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे. चार्ज उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपु विभाग शिरपूर पोठनि/ संदिप मुरकुटे,पोउनि/ गणेश कुटे, तपासी अमंलदार/ पोना- ६१८ पंकज.पी.पाटील, पोहेकॉ/ १८८ बालमुकुंद एम. दुसाने, पोना/१३७१ अनिल.सी.जाधव, पोना / ३७ रविंद्र आखडमल, पोकॉ/ १४६१ विनोद आखडमल पोको १७२६ आरिफ तडवी,पोकों/ १२१४ विलास कोळी, पोका ४६९ विवेकानंद जाधव,अश्यांनी सदरची कामगीरी केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध