Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २ एप्रिल, २०२३

शिरपूर तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे शहरात वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन ,आ.अमरीश भाई पटेल व बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वात भव्य यात्रा,मी सावरकर च्या घोषणा…



शिरपूर प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अनादर करत मी सावरकर नाही मी माफी मागणार नाही असे उद्गार काढले होते.यानंतर देशातील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या. सावरकर हे फक्त एक नाव नसून तो एक विचार आहे,त्यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय असून कोणत्याही राष्ट्रपुरुषाबाबत अवमानकारक वक्तव्य करण्याच्या आम्हा कोणासही अधिकार नाही. त्यांनी केलेले त्याग व बलिदान व स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान , त्यांचे विचार हे नेहमीच देशाला प्रेरणा देणारे असून राहुल गांधींना असलेल्या अपूर्ण इतिहासाची माहिती त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले असावे असा आरोप करत त्यांच्या या वक्तव्याच्या भारतीय जनता पार्टीने निषेध केला होता.

म्हणून दिनांक 30 एप्रिल पासून महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पार्टीने राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात सावरकरांच्या सन्मानात व त्यांच्या विचारांची ज्योत नवीन पिढीच्या समोर मांडण्यासाठी, व सावरकरांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचे आयोजन केले आहे.

त्यानुसार शिरपूर शहरात आज दिनांक 2 एप्रिल रोजी सकाळी १० वा. भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष, व इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मेन रोडवरील चोपडा जीन येथून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रेला सुरुवात झाली होती.यावेळेस प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार अमरीश भाई पटेल ,आमदार काशीराम पावरा,भाजप प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ चौधरी,धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के.डी.पाटील, रावसाहेब प्रभाकर चव्हाण,जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, विकी चौधरी, महेंद्र पाटील, मंगेश पाटील हिसाळे, प्रशांत चौधरी, मुन्ना पाटील शिंगावे, संजय आसापुरे, मनोज धनगर,तालुकाभरातील सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व राष्ट्रप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते.

सदरची गौरव यात्रा ही सर्वांनी मी सावरकर नावाची टोपी डोक्यावर घालून व गळ्यात मी सावरकरच लिहिलेला पट्टा टाकून मी सावरकर अशा घोषणा देत यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या समारोप विजयस्तंभ यावरील भाजप कार्यालयासमोर करण्यात आला.त्यावेळी आमदार काशीराम पावरा,भाजपा प्रदेश अध्यक्ष बबन चौधरी व सुभाष कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व यात्रेचा समारोप केला यासाठी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध