Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ मे, २०२३

शिरपूर तालुका भोई समाजाच्या वतीने दि.२५ मे रोजी संत भीमा भोई जयंतीनिमीत्त विविध कार्यक्रमांसह उत्साहात साजरी....



शिरपूर प्रतिनिधी:- दि.25 मे रोजी सकाळी ९ वाजता आदर्श नगर भोई गल्ली येथील भोई समाज भुवनात संतशिरोमणी संत भिमा भोई यांच्या प्रतीमेचे पुजन व भोई समाज अध्यक्ष व ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते सी.एम.भोई सर,गुलाब भोई व भाईदास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.व यांच्याच मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी भोई समाजातील युवक व युवतींनी शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.तर रात्री ८ वाजता बालाजी मंदिर चौकात संत भिमा भोई यांच्या जंयती निमित्त संतशिरोमणी संत भिमा भोई प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.काशीराम दादा पावरा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,धुळे जि.प.चे माजी अध्यक्ष डॉ.तुषारभाऊ रंधे,जि.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटील,माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी,
पत्रकार विनोद सोनार,शामकांत ईशी, जिल्हाध्यक्ष भाईदास देविदास मोरे,कार्याध्यक्ष सी.एम.भोई, माजी नगरसेवक गुलाब भोई,मंडळ अधिकारी प्रशांत ढोले,अभिमन भोई,सुभाष भोई,
संजय नंदुरबारे पत्रकार संतोष भोई,
यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.


याप्रसंगी आ.काशीराम पावरा म्हणाले की,आजच्या युवक व युवतींनी  शिक्षणासोबत अध्यात्माची कास धरली पाहिजे,जयंतीच्या माध्यमातून संतांचे विचार घराघरात पोहचविल्यास एक सक्षम पिढी घडविता येईल.आयुष्य जगतांना समाजाचे देणं लागतो याचे भान प्रत्येकाने ठेवून सामाजिक कार्यात सहभाग घेतला पाहिजे.गोरगरीबांना अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन यशवंत निकवाडे सर यांनी केले.तर समाजाचा हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा यासाठी उत्सव समिती कार्यकर्ते व समाजातील युवक व युवती तसेच समस्त भोई समाज बांधवानी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध