Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
नवागांव येथील स्मशानभूमीला मंजूर होऊन 3 वर्ष होऊन देखील काम सुरू नसल्याने जितेंद्र पावरा यांचे ग्रामपंचायतीला स्मरण पत्र सादर
नवागांव येथील स्मशानभूमीला मंजूर होऊन 3 वर्ष होऊन देखील काम सुरू नसल्याने जितेंद्र पावरा यांचे ग्रामपंचायतीला स्मरण पत्र सादर
शिरपुर प्रतिनिधी :- बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव पाड्यासाठी स्मशानभूमी काम सन 2021 कृतीआराखडा मंजुरी देण्यात आली होती मंजूरी होईन 3 वर्ष पूर्ण झाले असून काम सुरू करण्यात आले नसल्याने दि :-25/2/2023 रोजी ग्रामपंचायत ला काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे बाबत जितेंद्र पावरा यांनी अर्जाद्वारे मागणी केली होती पंरतु ग्रामपंचायत ने अर्जाची दखल घेतली नसल्याने आज दि :-2/5/2023 रोजी स्मशानभूमी संदर्भात स्मरण पत्र व दुसरे निवदेन ग्रामपंचायत ला सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सन 2021 मध्ये शासनाने 15 वा वित्त आयोग निधीतून 5 लाख 22 हजार रुपये शासनाने मंजूर सुध्दा करुन देण्यात आला होता त्याकामाचा शासनाने सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 कालावधी देऊन सुध्दा त्या कामाला 3 वर्षा झाले असून देखील आजही नवागांव येथील स्मशानभूमी चे काम सुरू करण्यातात आले नसल्याचे दिसून येते आहे....
शासनाने अत्यंत आवश्यक असल्याले कामांना मंजुरी देऊन निधी सुध्दा ग्रामपंचायत ला पाठवले असुन देखील 3 वर्ष पूर्ण होऊन देखील ग्रामपंचायत कामाला सुरुवात करत नसेल तर मंजुर झालेल्या काम फक्त कागदावरच का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा