Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १२ मे, २०२३

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई गुटख्याची तस्करी : दोन ट्रकांसह ८२.. लाखांच्या मुद्देमाल जप्त



शिरपूर : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित सुगंधीत रत्ना कंपनीच्या तंबाखू सहगुटख्याची होणारी तस्करी रोखण्यात शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी अडाखड तपासणी नाक्यावर व दहिवद शिवारात दोन ट्रक पकडले या कारवाई वाहनांसह ८३ लाख २४ हजार चारशे रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची दोन वेगवेगळ्या माळ ट्रक मधून छोटी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी ( ता. १० ) रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेडा सीमा तपासणी नाक्यावर आपला लावून मानाची तपासणी केली या दरम्यान मध्य प्रदेश राज्याकडून महाराष्ट्रात येणारा मालट्रक ( केए. ०१ / एजे ००१५ ) पोलिसांनी पकडला निवांत पोलीस ठाण्यात आणून तपासणी केली असता त्यात गुटख्याच्या साठा मिळून आला या ३३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या रत्ना तीन हजार कंपनीच्या सुगंधित तंबाखूचे एकूण २८० खोके व पंधरा लाख व पंधरा लाख रुपये किमतीच्या माटलट्रक जप्त केला दुसऱ्या कारवाईत पहाटे चार वाजेच्या सुमारास दहिवद शिवारातील छत्रपती हॉटेल जवळ सापळा लावून मध्य प्रदेशातून येणारा मालट्रक ( केए. ०१ / एजे. २७७६ ) पकडण्यात आला या ट्रक मधून बारा लाख रुपये किमतीचा रत्ना कंपनीच्या सुगंधीत तंबाखूचे शंभर खोके सात लाख ६४ हजार चारशे रुपये किमतीचे प्रभात ३१० कंपनीच्या सुगंधीत तंबाखूचे ६५ खोके व १५ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३४ लाख ६४ हजार चारशे रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही कारवाईत एकूण ८३ लाख २४ हजार चारशे रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला आहे याप्रकरणी चालक किशोर राव एन.नरेंद्र राव ( ३१ )  रा. बेंगलोर कर्नाटक,मंजू रोकडदम चनप्पा ( ३३ ) रा. धारावाड कर्नाटक या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस उपअधीक्षक अंन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील कृष्णा पाटील,हेड कॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी,पो.ना.संदीप ठाकरे,रोहिदास पवार,संतोष पाटील,मनोज पाटील,इसरार फारुकी ,कृष्णा पावरा योगेश मोरे ,मुकेश पवार इत्यादींनी कारवाई केली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध