Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २७ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा आयशर वाहनांसह मुद्देमाल हस्तगत व आरोपीजेरबंद
शिरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा आयशर वाहनांसह मुद्देमाल हस्तगत व आरोपीजेरबंद
शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखूची वाहतूक करणारा आरोपी वाहन व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे यात एकुण ३९,७४,०००/- रू. किं. चा मुद्देमाल त्यात १९,७४,०००/- रू. किं.ची सुगंधीत तम्बाखुसह २०,००,०००/- रू. किं.चे आयसर वाहनासह ०१ आरोपी जेरबंद करण्यात आला आहे.
शिरपूर शहर पो.स्टे.चे पोनि आगरकर सो यांना दि.२७/०५/२०२३ रोजी रात्री २.१५ वाजेचे सुमारास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडुन शिरपुरकडे आयसर वाहन क्र.यु.पी. ५३/ इ.टी. ०२४१ असे वाहन येत असुन त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला सुगंधी तम्बाखुचा माल भरलेला आहे. त्यानुसार पोनि आगरकर सो यांनी पोसई/संदिप मुरकुटे यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने पोसई/संदिप मुरकुटे यांनी डी. बी. पथकासह शहादा फाटा, कळमसरे शिवार ता. शिरपूर जि. धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता. राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडुन शिरपूरकडे येणारे आयसर वाहन क्र. यु.पी. ५३ / इ.टी. ०२४१ असे ३.०० वाजेच सुमारास शिताफीने पकडले असता सदर वाहनावरील चालक जमाल अली अहमद वय ४८ रा. नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि. फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश हा सदर वाहनात प्लॅस्टीक फिल्म मालाचे आडोशास १९,७४,०००/- रू. किं.ची भोला छाप सुगंधीत तम्बाखुचा माल भरलेले पिवळ्या रंगाचे प्लॅस्टीक गोणटी असलेले ९ कार्टुन व पांढऱ्या रंगाचे प्लॅस्टीक गोणटी असलेले ४१ कार्टुण असे एकूण ५० कार्टुण नेतांना मिळुन आल्याने सदरचा माल महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत असल्याने सदर मालासह २०,००,०००/- रू. कि.चे आयसर वाहन क्र. यु.पी. ५३/ इ.टी.०२४९ सह एकुण ३९,७४,०००/- रू. किं.चा मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार अन्न व सुरक्षा अधिकारांनी शिरपूर शहर पो.स्टे.ला येवून वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्यादी होवुन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.सदर गुन्ह्यात आरोपी नामे जमाल अली अहमद वय ४८ रा. नारायचा जाफरगंज ता. बिडकी जि. फतेहपुर हासवा राज्य उत्तर प्रदेश यास अटक करण्याची तजवीज ठेवली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.संजय वारकुंड,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे. चार्ज उप विभागीय अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर, पोउनि / संदिप मुरकुटे, तसेच डी.बी.पथकाचे पोहेकॉ / ललीत पाटील,लादूराम चौधरी,पोना/मनोज पाटील, पोकॉ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, स्वप्निल बांगर,अमित रणमळे,मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, सचिन वाघ,भटु साळंके, प्रविण गोसावी तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी अशांनी मिळून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा