Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ भिमाभोई जंयती चाळीसगांव शहरात घाटरोड परिसरातील भोईगल्लीत उत्साहात संपन्न...
भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ भिमाभोई जंयती चाळीसगांव शहरात घाटरोड परिसरातील भोईगल्लीत उत्साहात संपन्न...
चाळीसगाव प्रतिनिधी :-दिनांक २५ मे, २०२३ रोजी चाळीसगांव शहरातील घाटरोड येथील भोईगल्लीत भोई समाजाचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ भिमाभोई जंयती उत्साहात संपन्न झाली, जयंतीचे वेळी संत भिमाभोई यांचे प्रतिमेचे पुजन करण्यांत आले, प्रस्तुत कार्यक्रम सन्मानीय आमदार श्री.मंगेशदादा चव्हाण दादासाहेब,यांचे विषेश उपस्थित पार पडला, या जयंतीच्या कार्यकमांचे अध्यक्ष श्री.दिपक भोई यांनी आमदार श्री.मंगेशदादा चव्हाण दादासाहेब यांचा यथोचित सत्कार केला, त्याच बरोबर, जितेंद्र धनराळे नायब तहसिलदार यांचा समाजातील व्यक्ती नायब तहसिलदार या पदापर्यत गेल्याने त्यांचा सन्मानिय आमदार श्री.मंगेश चव्हाण यांचे शुभेहस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तु देवुन सम्नानित करण्यांत आला.
या प्रंसगी सन्मानिय आमदार श्री.मंगेश चव्हाण यांनी समाजाला संबोधित केले व आत्ता शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणाच्या प्रवाहात यावे, तसेच इतर व्यवसायात तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कटीबध्द असुन योग्य ती मदत करण्यांचे आश्वासित केले.
कार्यक्रमात विषेश अतिथी नायब तहसिलदार श्री.धनराळे यांनी आपल्या मनोगतात असेही म्हटंले की, व्यक्ती जन्माने नव्हे तर कर्माने महान होतो, संतभिमा भोई एका सामान्य कुंटूबात जन्माला आले, शिक्षण घेवुन त्यांनी रंजल्या गाजलेल्या माणासांविषयी सतत विचार करुन दुखाचे कारण म्हणजे अज्ञान आहे हे लक्षात आल्याने त्यांनी चिंतन व मनन करुन त्यावेळेचे संताच्या सहवासात राहुन अभ्यास करुन समाजाला दिशा देण्यांचे काम केले. त्याच बरोबर समाजातील तळगळातील माणसाला मदत करणे हाच खरा भक्ती भाव हीच परमेश्वराची पूजा आहे असे आवर्जुन सांगितले. भोई समाजात माझा जन्म झाला व नायब तहसिलदार या पदावर आज काम करीत आहे, यांचा आंनद आहे परंतु, समाज अदयापही तितका शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करीत नाही ही खंत मनाला नेहमी बोचत असते.समाजाने शिस्तप्रिय वागुन आपल्याकडुन कोणीही दुखी होणार नाही कोणालाही त्रास होणान नाही असे वागावे, तसेच समाजाचे मुले मुली यांनी शिक्षण घ्यावे मोठे व्हावे, डॉक्टर, इंजीनिअर, प्राध्यापक व्हावे अशा तेव्हाच खंरे अर्थाने संत भिमा भोई यांच्या नांवाचा झेंडा आभाळात उंच, उंच, फडकवत ठेवल्याचा परमांनद होईल, त्यामुळे मुलांना मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है,पंख बडे होनेसे कुछ नही हातो हौसलोसेही उँची उडान होती है, बांळानो खूप शिका, मोठ्ठे व्हा,आई वडील व आपल्या समाजाचे नांव, उज्वल करा छोटया अपयशाने खचुन जावु नका आत्मविश्वास आणि सचोटीने यशव्ही व्हा,असे शुभाशिष चिंतले, त्याचबरोबर,सन्मानिय आमदारसाहेब, श्रीयुत. मंगेशजी चव्हाण.यांचे शुभहस्ते तसेच चाळीसगांव तालुक्याचे समाजाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांनी यथोचित सन्मानित सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व सर्वांना संत भिमाभोई जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व धन्यवाद दिले..
कार्यक्रमात वैभव प्रशांत भोई हा इयत्ता आठवीच्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यातुन पहिला क्रमांक मानकरी ठरल्याबद्दल त्यांचा विषेश सत्कार सन्मानिय आमदार श्री.मंगेश चव्हाण यांचे शुभेहस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तु देवुन सम्नानित करण्यांत आले.
प्रंसगी भोईराज फांउन्डेशन या फलकाचे अनावरण करण्यांत आले, यावेळी चेतन भोई व इतर भोई समाजाचे तरूणवर्गाचा प्रतिसाद लाभला. जयंती निर्मीत समस्त भोई समाजाचे सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष श्री.मल्हारी संपत भोई सचिव श्री.रविंद्र विठ्ठल भोई सहसचिव श्री.अनिल उत्तम भोई तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गंभीर भोई कार्याध्यक्ष श्री.आबा चंद्रकांत भोई खजिनदार श्री.चेतन विश्वनाथ भोई तसेच समाजाचे सर्वच बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी संजीव आबा साहेब, तसेच इतर समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते, कार्यक्रमांचे अध्यक्ष श्री. दिपकजी भोई यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले, प्रास्ताविक श्री.ज्ञानेश्वर भोई यांनी केले, तर सुत्रसंचालन व आभार प्रा.श्री.मनोहरजी आंधळे, यांनी केले,या बद्दल त्यांचा विषेश सत्कार श्री.धनराळे यांनी केला व कार्यक्रम संपन्न झाला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा