Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २९ मे, २०२३

पिंप्रीसेकमच्या शेतकरी आंदोलकांची आमदार सत्यजीत तांबेंनी यांनी घेतली भेट.



भारनियमनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरु आहे आंदोलन.

प्रतिनिधी :-२९ मे २०२३ रब्बी हंगाम सुरू असून शेतीसाठी होणारे भारनियमन रद्द करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत व त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठया नुकसानीला तोंड द्यावे लागत असून तात्काळ भारनियमन रद्द करण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ह्या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार सत्यजीत तांबे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आहेत.

पिंप्रीसेकम संघर्ष समितीच्या वतीने आमदार सत्यजीत तांबे यांना एक निवेदन देखील देण्यात आले आहे. सदर निवेदन पत्रात पिंप्रीसेकम गाव पूरग्रस्ताच्या यादीत येत असून गावाला भविष्यात गावठाण विस्ताराकरीता गट नं. २०५ हि मिळकत गावठाणाकडे वर्ग करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्गमित करण्यात आले असूनदेखील ते अद्याप प्रलंबित आहे.तसेच दिपनगर महानिर्मिती प्रशासन यांनी पिंप्रीसेकम गाव दत्तक गाव म्हणून जाहीर


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध