Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३१ मे, २०२३
शिरपूरच्या त्या तरुणाला झाली अखेर जन्मठेप
शिरपूर (प्रतिनिधी) या घटनेची हकीकत अशी की, दि.२५/०३/२०१९ रोजी वडगल्ली शिरपूर येथील रेणुका धनगर हिने नरेंद्र एकनाथ भदाने रा. शिरपूर यांचेशी लग्न केले नाही या कारणावरुन आरोपी याने रेणुकास शिरपूर फाटा येथील संगिता लॉजवर सकाळी ९.४५ बोलावून सकाळी ११.३० वाजेपूर्वी धारदार हत्याराने गळा चिरुन हत्या केली व पळून गेला व सदर घटना पिडीतेच्या आई वडीलांना स्वतः आरोपी नरेंद्र उर्फ पप्पु शेटे याने फोनवर कळविली.सदर खटला मा. न्यायालयांत पुराव्यासह सिध्द झाल्याने धुळे येथील मा.सत्र न्यायमुर्ती श्री.ए. एच.सैय्यद यांनी आरोपीतास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली मयता सोबतची मोबाईल सेल्फी ठरली घातक तसेच तपास कामी आरोपी नरेंद्र उर्फ पप्पु शेटे याचा मोबाईल (स्मार्ट फोन) जप्त केला सदरच्या फोनची तपासणी केली असता,त्या मोबाईलमध्ये आरोपीने मयतासोबत खुन करण्यापूर्वी सेल्फी फोटो व खुन केल्यानंतर रक्ताच्या थारोळयांत पडलेली रेणुका हिचा फोटो काढल्याचे लक्षात आले.तपास पुर्ण झाल्यावर मे. न्यायालयांत आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.आरोप निश्चिती नंतर सदरहु खटल्याची सुनवणी धुळे येथील मा.सत्र न्यायमुर्ती श्री.ए.एच. सैय्यद यांच्या न्यायालयात सुरु झाली.
सदरच्या साक्षीदारांच्या साक्षीनुसार आलेल्या पुराव्यांच्या आधारे मे. न्यायालयात जिल्हा सरकारी वकील श्री.देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला.व मा. सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालयाचे दाखले मे.न्यायालयात युक्तीवादा दरम्यान दाखल केले.
मोबाईल मधील सेल्फी व मयताचा रक्ताच्या थारोळयातील फोटो सिध्द करतो की,मरणापूर्वी दोघेही एकत्र होते व फोटोने सुध्दा लास्ट सीन थेअरी ही सिध्द होते.फोटो हा सायलेंट विटनेस आहे हे सप्रमाणात अँड श्री.तवर यांनी सिध्द झाले आहे असा महत्वपूर्ण युक्तीवाद केला.
सदरच्या खटल्यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील श्री.देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी कामकाज पाहीले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा