Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ जून, २०२३

सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा अन्यथा कायदेशीर कारवाई...! पोलीस अधीक्षक धुळे



धुळे प्रतिनिधी :-धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीत दि.०६/०६/२०२३ रोजीचे १२/०० वा. ते दि. ०७/०६/२०२३ रोजी पहाटे ०६/०० वा.चे दरम्यान धुळे शहरात साक्रीरोड, मोगलाई,फुलेनगर जवळ सार्वजनिक शौचालयाचे समोरील श्रीराम मंदीरातील मुर्तीची विटंबना करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखविण्याचे व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचे उददेशाने कटकारस्थान केल्यावरुन गुन्हा दाखल आहे.सदर घटनेबाबत सकल हिंदू समाज,धुळे वतीने दि. १०/०६/ २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता हिंदु जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

धुळे शहराची तसेच जिल्हयाची पाश्वभूमी पाहता धुळे शहर हे जातीयदृष्टया अंत्यत संवेदनशिल शहर असुन यापुर्वी अशा कारणांवरुन जातीय दंगली होवुन मोठया प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दि.१०/०६/२०२३ रोजी काढण्यात येणा-या हिंदू जन आक्रोश मोर्चाांचे अनुषंगाने सोशल मिडीयावर काही लोक धुळे बंद,धुळे मोर्चा आहे बाबत व्हिडीओ तयार करुन व्हायरल करीत आहे.त्यातील काही व्हिडीओ हे आक्रमक दिसुन येत आहे, ते आपल्या जिल्हाचे आपल्या राज्याचे नाही आहे जुने काही इतर व्हिडीओ बनवून मोर्चा संबधाने व्हायरल करीत आहे.असे व्हिडीओ कोणी फॉरवड करु नये ज्यामुळे अफवा पसविली जाणार नाही त्यामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे व्हिडीओ कोणी व्हायरल केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे त्यांना भविष्यात अडचणीचा सामना करावा लागु शकतो यांची नोंद घ्यावी. धुळ्यात सद्या शांतता आहे अशीच शांतता अबाधित राहण्यासाठी सर्व लोकांनी सहकार्य करावे.कोणीही कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवु नये.सत्यपरिस्थितीची आपण पडताळणीचा आपण प्रयत्न करावा.उद्या निघणाऱ्या मिरवणुकी बाबत पोलीस यंत्रणा सक्षम आहे.

धुळे शहरातील प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणुन सी.आर.पी.सी.१४४ (२) चे मनाई आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.नागरीकांनी शांतता पाळावी अफवावर विश्वास ठेवु नये.त्यामुळे सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत करावी असे आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध