Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

साक्री तालुक्याचा समावेश पोखरा योजनेत करावा. या मागणीसह विविध विषयांनावर शेणपूरचे प्रगतिशील शेतकरी श्री.दीपक काकुस्ते यांनी शेती विषयक विविध समस्यांवर कृषिमंत्री मा.ना.धनंजय मुंडे यांची भेट घेत केली चर्चा.



साक्री तालुक्यातील शेणपुर गावचे प्रगतिशील शेतकरी श्री.दीपक हरी काकूंस्ते यांनी महाराष्ट्रात राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री मा. ना.धनंजय मुंडे साहेबांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या येणाऱ्या समस्यांवर चर्चा करून साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे गाऱ्हाणे मुंडे साहेबांसमोर मांडल्या. तसेच 2018-19 ची दुष्काळग्रस्त भागाची आणेवारी मिळालेली नाही हे त्यांच्या लक्षत आणून देत ते त्वरित वितरित करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे अनुदान व विविध शेती योजनांचे अनुदान जे थांबलेले आहे ते त्वरित वितरित करण्यात यावे. तसेच मुंडे साहेबांना धुळे जिल्ह्यात झालेल्या बोगस खत विक्री रॅकेट संदर्भात ही उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी यावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली  एक शेतकरी म्हणून शेतकरी.... शेतकरी पुत्र धनंजय मुंडे साहेबांना साक्री तालुक्यातील पावसाचे प्रमाण देखील कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी कोलमडली आहेत तसेच पिक विमा संदर्भात मिळणारी रक्कम ही शेतकऱ्यांना त्वरित वितरित करण्यात यावी अशा अनेक समस्यांवर भाजपचे कार्यकर्ते तसेच शेणपूर गावचे प्रगतीशील शेतकरी दीपक काकुस्ते यांनी समक्ष भेट घेऊन चर्चा केली.तसेच साक्री तालुक्यातील शेणपुर मलांजन व धाडने,नवडने या गावाची पिकविम्यात सोयाबीन या पिकाची समावेश करावा 
 साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी योजना विषयक अडचणी येतात त्यांच्यामध्ये तालुका कृषी अधिकाऱ्यांना आदेश देऊन थांबलेली सर्व योजनांचे वितरित करण्याची विनंती केली.त्याच बरोबर त्यांच्या स्तुत्य निवडी बद्दल अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध