Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

निसर्ग समिती तर्फे मोरदड गावात भव्य वृक्ष दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न



धुळे तालुक्यातील मोरदड येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्था संचलित माध्यमिक विद्यालय मोरदड येथे निसर्ग मित्र समिती तर्फे भव्य वृक्षदिंडी व वृक्षारोपणाचा कार्यक्रम विविध मान्यवराच्या हस्ते संपन्न झाला,
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व मोरदड येथील माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने माझी वसुंधरा व वन महोत्सव निमित्ताने मोडदड येथे भव्य वृक्षारोपण व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते ,
यावेळी वृक्षदिंडी चे पूजन व हिरवा झेंडा  कार्यक्रमाचे अध्यक्ष निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष तथा से नि उपशिक्षण अधिकारी डी बी पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गावात भव्य वृक्ष दिंडी काढण्यात आली, यावेळी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, निसर्ग मित्र समितीचे राज्य महासचिव संतोषराव पाटील ,मोरदड माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र देविदास भदाणे, सरपंच सौ कल्पनाबाई मराठे, उपसरपंच गोविंद भाऊ मराठे,वनपाल दिलीप महारु पाटील, वनपाल पी आर जगताप ,एस के भामरे, पोलीस पाटील गुलाबराव कोळी, शिक्षण विभागाचे मधुकर माळी, ठाकूर नाना व निसर्ग मित्र समितीचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य आर ए पाटील, धुळे तालुका अध्यक्ष मनोज पाटील, माजी सैनिक मुरलीधर बाविस्कर व ग्रामस्थ तसेच गावातील परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक विभागातील, विविध क्षेत्रातील नामवंत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोरदड माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले, वृक्षारोपण करण्यात आलेले वृक्षांचा पुढील वर्षात भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा  करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भदाणे यांनी दिली, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोरदड माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पंचक्रोशीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचालन श्रीमती शेवाळे मँडम यांनी केले, अशी माहिती निसर्ग समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मोरदड माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन राजेंद्र देविदास भदाणे यांनी पत्रकॉन्वये दिली आहे,


तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध