Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३

शिरपूर तालुका पत्रकार संघाकडून निषेध व निवेदन...! आमदारांची पत्रकारास शिवीगाळ,



शिरपूर प्रतिनिधी :- जळगाव जिल्ह्यातील भडगाव पाचोरा येथे अल्पवयीन बालिकेवर झालेला अत्याचार व अमानुष कृत्य या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून अत्यंत दुःखद आहे.

यावेळी निघालेल्या मुक जन आक्रोश मोर्चा वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत पीडित कुटुंबातील मुलीच्या पित्याची फोनवर बोलून सांत्वन केले व कार्यवाहीचे आश्वासन दिले.या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील एक पत्रकार यांनी केलेले वार्तांकन व त्यांनी वापरलेला एक साधा शब्द त्यावर आक्षेप नोंदवत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी फोनवरून त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर आमदार महोदय येथेच थांबले नाही तर त्यांनी केलेल्या शिवीगाळाचे समर्थन देखील केले आहे. त्यामुळे जर आमदारच संविधानाचे कायद्याचे पालन करणार नसतील तर सामान्य माणसाकडून त्याची अपेक्षा काय करणार ? जर पत्रकाराचे काही चुकले असेल तर त्यास विरोध करण्याच्या देखील काही संविधानिक पद्धत आहे.मात्र त्याच्या अवलंब न करता स्वतःकायदा हातात घेऊन आमदार महोदयांनी संबंधित पत्रकारावर दबाव निर्माण करून शिवीगाळ केली आहे.
या घटनेची क्लिप सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पत्रकार क्षेत्रातून महाराष्ट्रभरातून त्यावर टीका करण्यात आली व त्याच्या निषेध व्यक्त करण्यात आला.


आमदाराने पत्रकाराला शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शिरपुरात पत्रकारांनी निषेध व्यक्त करून संबंधित दोषी आमदारांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अन्यथा येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी शिरपूर तालुक्यातील सर्व पत्रकार काळी फीत लावून आपली नाराजी व्यक्त करतील अशा निर्धार व्यक्त केला असून प्रांताधिकारी शिरपूर व डीवायएसपी शिरपूर दिले निवेदन दिले आहे.

पत्रकार हा लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा घटक मानला जातो. लोकशाही व्यवस्था सुदृढ ठेवण्यात प्रसारमाध्यामांची भूमिका महत्वाची ठरते. पत्रकार समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो.चुकीच्या व समाजव्यवस्थेला घातक ठरणाऱ्या बाबी प्रसारमाध्यमे उघडकीस आणतात.पत्रकार हा समाज व्यवस्थेत रखवालदाराचे काम करीत असतांना पाचोरा तालुक्यात स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचे प्रकरण नुकतेच घडले आहे.

लोकप्रतिनिधीने पत्रकाराला अशी वर्तणूक देणे हा लोकशाहीचा व माध्यमांचा अवमान असून आ.किशोर पाटील यांच्या या वर्तनाचा शिरपूर तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांतर्फे निषेध करीत असून त्यांच्यावर कठोर करवाई करण्या यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.याप्रसंगी प्रेस क्लब,भारतीय पत्रकार महासंघ,व्हॉईस ऑफ मीडिया,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ,अखिल मराठी पत्रकार मंच,न्यूज पेपर,एडिटर्स अँड रिपोर्टर असोशीयशन,धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आदी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य आणि पत्रकार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध