Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ८ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील कृषी विभागाच्या अंतर्गत शेतीशाळा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी सहायक जे.बी.पगारे
साक्री तालुक्यातील कृषी विभागाच्या अंतर्गत शेतीशाळा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी सहायक जे.बी.पगारे
साक्री कृषी विभागाच्या शेतीशाळा अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग विषयी माहिती.
असताना येथे कृषी विभागाच्या बाजरी पिकाच्या शेती शाळा मध्ये शेतकऱ्यांना बाजरी पिकाचे पेरणी पासून काढणीपर्यंत बियाणे खते याविषयी शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले .
यावेळी कृषी सहायक श्री.जितेंद्र बी.पगारे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना सन २०२०-२१ पासून ते सन ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत वैयक्तिक मालकी भागीदारी,शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी या शासकीय व खासगी वैयक्तिक तसेच संस्थांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदान लाभ देय आहे.तर सूक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगांना सामाईक पायाभूत सुविधांकरिता गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक संस्था,शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था,स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के,जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदान लाभ मिळणार आहे.
या योजनेमध्ये शेतकऱ्यांना खालील प्रक्रिया उद्योग उभारता येऊ शकते व त्यासाठी शासनाकडून पस्तीस टक्के अनुदान देखीलमिळणार आहे.
दूध प्रक्रिया खवा,बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी.
मसाले प्रक्रिया चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला,शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी,जवसाची चटणी.
पालेभाज्या व फळे प्रक्रिया आंबा, सिताफळ,पेरु,सफरचंद,आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच,बोर,जांभूळ इत्यादीपासूनचा प्रक्रिया उद्योग,जाम,जेली,आईस्क्रीम,रबडी, काजू, बदाम, पिस्ता,बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रेडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.
तेलघाणा प्रक्रिया शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल,तीळ,बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.
पावडर उत्पादन प्रक्रिया काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,ज्वारी,गहू, मिरची,धना,जिरे,गूळ,हळद.
पशुखाद्य निर्मिती मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड,भरड धान्य इत्यादी.
कडधान्य प्रक्रिया हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे),बेसन तयार करणे इत्यादी.
राईस मिल चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
बेकरी उत्पादन प्रक्रिया बिस्कीट, खपली गहू बिस्कीट,मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक,केक,बर्फी,खारी,टोस्ट,ब्रेड, बनपाव,शेव,फरसाण,चिवडा,भडंग,केळी चिप्स,बटाटा चिप्स,फुटाणे, चिरमुरे,
या शेती शाळेत गावातील ललित साहेबराव पाटील,दत्तात्रेय वेडू भदाणे,मधुकर भटू भदाने,प्रदीप केवळ देवरे,राजेंद्र वसंत देवरे प्रभाकर उत्तम देवरे,शिवाजी भाऊराव देवरे, पंडित यशवंत देवरे,गुलाब दौलत सोनवणे शांताराम दिगंबर देवरे,प्रमोद गुलाब देवरे, सुरेश यादव भवरे,खंडू नथू देवरे.अशाप्रकारे मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
यासाठी शेती शाळेला मंडळ कृषी अधिकारी श्री सुरेंद्र शिंदे व तालुका कृषी अधिकारी श्री योगेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा