Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
जिल्हा लाल बावटा व राज्य किसान सभेने तहसीलदार महेंद्र माळी यांना शिरपूर तालुका कोरडा दुष्काळ जाहिर करा
जिल्हा लाल बावटा व राज्य किसान सभेने तहसीलदार महेंद्र माळी यांना शिरपूर तालुका कोरडा दुष्काळ जाहिर करा
शिरपूर तालुक्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असून शेती पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे त्यामुळे शासनाने शिरपुर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा लाल बावटा व राज्य किसान सभेने आमोदे येथील रामदेवबाबा मंदिरापासून सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयावर पायी मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार महेंद्र माळी यांना देण्यात आले.
जिल्हा लाल बावटा व राज्य किसान सभेने तहसीलदार महेंद्र माळी यांना शिरपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहिर करण्यासह गायराण जमीन, गायराण गावठाण जागा,वृध्द शेतकरी शेतमजूरांचे पेंन्शन, आणि रखडलेले अनुदान रेशन कार्डबबाबत नागरिकांची होणारी पिळवणूक व रेशन काळा बाजार.दहिवद फाटा ते अनेर पुलापर्यंत रस्त्याचे काम,सांगवी दंगलीतील निरपराध आदिवासींवरील गुन्हे मागे घ्या. मजूरांना रोजगार हमी योजनेचे कामे द्यावी ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना ५% टक्के अनूदान द्या.या व आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष ऍड हिरालाल परदेशी,लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष
ऑड संतोष पाटील, कॉम्रेड वसंत पाटील,रामचंद पावरा, साहेबराव पाटील,कवरलाल कोळी,रविंद्र पाटील,जितेंद्र देवरे,कावा पावरा,अर्जुन कोळी, कैलास पाटील,डॉ.किशोर सुर्यवंशी,सतिलाल पावरा, शिवाजी पाटील,पोपटराव चौधरी आदी पदाधिकारी,कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मोर्चा प्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांच्या नेतृत्वात पीएसआय हेमंत खैरनार यांनी पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा