Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच स्वीकारताना आज सोमवारी दुपारी रंगेहात अटक
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच स्वीकारताना आज सोमवारी दुपारी रंगेहात अटक
धुळे प्रतिनिधी:- ४ सप्टेंबर २०२३ जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून आठवड्यातून एक तरी कारवाई होतच आहे. अशातच आता चाळीसगावातील रहिवासी व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच स्वीकारताना आज सोमवारी दुपारी रंगेहात अटक करण्यात आलीय. देवराम किसन लांडे (शशिकला नगर, चाळीसगाव) असं लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून या कारवाईने आरोग्य यंत्रणेतील लाचखोर हादरले आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य वर्धिनी योजनेंतर्गत तक्रारदाराची जमीन भाड्याने घेऊन त्यावर नियमित भाडे सुरू करण्यासाठी ही लाच स्वीकारण्यात आली.
देवराम किसन लांडे लाचेची मागणी केल्याने जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यांनुसार धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात सहकाऱ्यांनी देवराम लांडे याला लाच घेताना तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष 50,000/- रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संपादकीय :- राज्यात गाजत असलेल्या कथित शालार्थ आयडी प्रकरणाने आता केवळ काही व्यक्ती किंवा संस्थांपुरता मर्यादित प्रश्न राहिलेला नाही. उलट, य...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा