Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
माणिकबाबा विद्यालय शेळगाव,येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न...
माणिकबाबा विद्यालय शेळगाव,येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न...
परंडा (राहूल शिंदे) दि.४ तालुक्यातील शेळगाव येथील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय शालेय सांघिक मल्लखांब क्रीडा स्पर्धा सन २०२३-२४ संपन्न झाली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी प्राचार्य सुधाकर खरसडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी,परंडा तालुका क्रीडा संयोजक सचिन पाटील,तुळजापूरचे दादाराव घोडके आणि विद्यालयाचे माजी क्रीडा शिक्षक कुटे,माणिकबाबा विद्यालयाचे प्राचार्य गुरुदास काळे, सनराईज स्कूल शेळगावचे मुख्याध्यापक संभाजी देवकर, क्रीडा शिक्षक सतीश शिंगाडे, राहूल शिंदे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव येथील आरोग्य कर्मचारी रुग्णवाहिकेसह उपस्थितीत होते व विद्यार्थी यांच्या सह इतर पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करून व मल्लखांबांचे पुजन करून स्पर्धेची सुरुवात झाली.
ही स्पर्धा १४,१७,१९ या वयोगटात घेण्यात आली. यामधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. १४ वर्ष मुले गट माणिकबाबा विद्यालय शेळगाव ३ मुले व श्री.श्री गुरुकुल अणदुर ता.तुळजापूर २ मुले, १४ वर्ष मुली गट श्री.श्री गुरुकुल अणदुर ता.तुळजापूर.१७ आणि १९ वर्ष मुले-मुली या दोन्ही गटात माणिकबाबा विद्यालय शेळगाव ता.परंडा यांनी विजय मिळवून जिल्हात प्रथम येण्याचा मान मिळवुन विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
सर्व पात्र झालेल्या खेळाडूंचं व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संस्थापक अध्यक्ष अँड.सुभाषराव मोरे, संस्था सचिव अमर मोरे , सर्व संस्था पदाधिकारी, माजी प्राचार्य संभाजीराव मोरे ,पालक आणि ग्रामस्थ यांनी खुप खुप अभिनंदन केले.व पुढील विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा