Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकार दिवस साजरा करा....! आरटीआय कार्यकर्त्यांची सर्व शासकीय कार्यालयात निवेदने सादर....!
माहिती अधिकार दिवस साजरा करा....! आरटीआय कार्यकर्त्यांची सर्व शासकीय कार्यालयात निवेदने सादर....!
शिरपूर प्रतिनिधी :- माहिती अधिकार हा नागरिकांना हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच या कायद्याचे महत्त्व व उपयोगिता सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिक यांना व्हावी म्हणून शासकीय आस्थापना म्हणून आपली जबाबदारी आहे. आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा असा शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/ पत्र क्र. ३७८/०८/सहा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ रोजी घेतला आहे.
सदर निर्णयानुसार दर वर्षी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजारा करण्याचे शासनाचे आदेश आहे. या निर्णयानुसार माहिती अधिकार या विषयावर विविध उपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना या माहिती अधिकार दिन उपक्रमात सहभागी करून घ्यावे व त्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थाची मदत घ्यावी असे शासनाने सूचविलेले आहे. त्याची आपल्या शासकीय कार्यालयात अंमजबजावणी व्हावी. या वर्षी २८ सप्टेंबर २०२३ या दिवशी अनंत चतुर्दशी तसेच ईद ए मिलाद या सणांची सूटटी असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी शक्य नसल्यास सदर माहिती अधिकार दिन हा २७ सप्टेंबर २०२३ किंवा २९ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा करावा तसेच तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तातडीने कराव्यात. या आशयाचे निवेदन आज शिरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय उपविभागीय अधिकारी शिरपूर, तहसीलदार कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, गटविकास अधिकारी पंचायत समिती शिरपूर, लघु पाटबंधारे विभाग, उपविभागीय लघुपाटबंधारे विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी कार्यालय इत्यादी विभागांना सदरचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख संजय नंदुरबारे, धुळे जिल्हाध्यक्ष पुनमचंद मोरे, धुळे जिल्हा संघटक महेंद्र जाधव, धुळे जिल्हा उपाध्यक्ष मूलचंद शिरसाठ, संतोष भोई संपादक तरुण गर्जना यांच्यासह इतर माहिती अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा