Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
सावळदे येथे उद्याेजक चिंतन पटेल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन तथा लाेकार्पण साेहळा संपन्न....!
सावळदे येथे उद्याेजक चिंतन पटेल यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन तथा लाेकार्पण साेहळा संपन्न....!
शिरपुर (प्रतिनिधी) तालुक्यातील सावळदे ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच तथा गटनेते सचिन राजपूत यांच्या वतीने काल दि.५ राेजी सांयकाळी गावातील विविध विकास कामे तसेच वास्तुंचे लाेकार्पण साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले होते.या विकास कामांचे उद्याेजक चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते भुमिपुजन व लाेकार्पण साेहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्याेजक चिंतनभाई पटेल तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिल महाजन, उपसरपंच सचिन राजपूत, सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद शिरसाठ, पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, पंचायत समिती सदस्य यतिश साेनवणे, कृ.उ.बा.समिती सदस्य विठाेबा महाजन, भाजपा युवा आघाडी अध्यक्ष आकाश मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष अतुल राजपूत, सामाजिक कार्यकर्ते नामदेव पवार आदी उपस्थित होते.
तर कार्यक्रमासाठी भाजपा युवा माेर्चाचे पदाधिकारी रितेश राजपूत, भुरा पाटील, अजिक्य शिरसाठ, राहुल जाधव, राेशन साेनवणे, रणजित राजपूत, मायकल ठाकरे, सुनिल मगरे, संदिप कुंवर तर सावळदे येथील प्रकाश भाेई, भास्कर महाजन, बाळू काेळी, ग्रामपंचायत सदस्य धुडकू जगदेव, राजु साेनवणे, प्रवीण जगदेव, अपर्णा जाधव, नंदाबाई जाधव उपस्थित हाेते.
यावेळी उद्याेजक चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते पंचवीस पंधरा, डाेंगरी विकास याेजनेतुन गाव अंतर्गत रस्ते, पेव्हर ब्लॉक, व्यायाम शाळा, तलाठी कार्यालय, प्राथमिक शाळा दुरूस्ती कामाचे भुमिपुजन करण्यात आले. तर स्मशानभूमी रस्ता दहन चाैथरा, पाण्याची टाकी, साेलर व हायमास्ट लॅम्प, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, मरीआई मंदिर सुशाेभिकरण इमारतीचे लाेकार्पण करण्यात आले.
यावेळी जयपालसिंह गिरासे यांनी आपले मनाेगत व्यक्त करतांना सांगितले की, सावळदे येथील पुरातन महादेव मंदीराला राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री.गिरीष महाजन, माजी शालेय शिक्षण मंत्री मा.अमरिशभाई पटेल, मा.आमदार काशीराम पावरा, ग्रामविकास मंत्री यांचे शासकीय सचिव संदिप जाधव, जि. प. सदस्या भैरवी शिरसाठ, पं.सदस्य विजय खैरनार, उपसरपंच तथा गटनेते सचिन राजपूत यांच्या प्रयत्नाने "क वर्ग तिर्थक्षेत्र" म्हणून दर्जा मिळाला ही तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे. यामुळे मंदिर परिसराच्या विकासाला बळ येईल असे सांगितले.
तर उपसरपंच तथा गटनेते सचिन जाधव यांनी सांगितले की, भविष्यात सावळदे येथील मंदिराला माेठा लाैकिक प्राप्त हाेणार असुन नेत्यांच्या आशिर्वादाने गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील आहे असे सचिन जाधव यांनी सांगितले.
तर उद्याेजक चिंतनभाई पटेल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, तालुक्यातील युवकांचा शैक्षणिक, सामाजिक, आराेग्य, बाैध्दीक विकास व्हावा यासाठी चिंतनभाई पटेल युवा प्रतिष्ठानच्या वतीने काम चालले आहे. प्रत्येकाच्या सुख: दुखाचे साथीदार हाेता यावे यासाठी ग्रामीण भागात आम्ही संवाद यात्रेचा आरंभ केला आहे. टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून अनेकांना राेजगार, शिरपुर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून उच्च शिक्षण, पाणी, आराेग्य,रस्ते विकासाचे जाळे तालुक्यात मा.अमरिशभाई पटेल साहेब यांनी विणले आहे. मला देखील या तालुक्यातील जनतेसाठी काम करायचे असुन संवाद यात्रेतुन समस्या जाणून घेत आहे.आपण देखील साथ द्यावी असे आवाहन चिंतनभाई पटेल यांनी युवकांना केले.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. एम.एल.जाधव, प्रास्ताविक जयपालसिंह गिरासे (पिंप्रीकर) तर आभार उपसरपंच सचिन राजपूत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावळदे येथील युवकांनी परिश्रम घेतले.कॅप्शन : सावळदे ता. शिरपुर येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन करतांना उद्याेजक श्री.चिंतनभाई पटेल, विठाेबा महाजन सरपंच अनिल महाजन, उपसरपंच सचिन राजपूत, पं. स.सदस्य यतिश साेनवणे, जयपालसिंह गिरासे, अतुल राजपूत आदी.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्ह्यात असलेल्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावाजवळील औद्योगिक प्रकल्पामुळे कथितरीत्या गंभीर पर्यावरणीय प्रदूषण होत ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा