Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेच्या गैरप्रकारांसंबंधी जागृत सभासदांतर्फे शिरपुर येथील पोलिस निरीक्षक आगरकर यांना निवेदन...!
शिरपुर मर्चंटस को-ऑप बँकेच्या गैरप्रकारांसंबंधी जागृत सभासदांतर्फे शिरपुर येथील पोलिस निरीक्षक आगरकर यांना निवेदन...!
शिरपुर (प्रतिनिधी):- शिरपुर शहरातील दि शिरपुर मर्चंटस को-ऑप बँक ही सभासदांकडून ठेवी गोळा करून कर्ज वितरण करते. परंतु मागील 4-5 वर्षांपासून या बँकेने सभासदांचा विश्वासघात करून आपल्या मर्जीतील काही ठराविक लोकांना बेकायदेशीर, नियमबाह्य व विनातारण कोट्यावधी रुपयांची कर्जे वाटप करून बँक आर्थिकदृष्या अत्यंत गंभीर परिस्थितीत आणलेली आहे. त्यासाठी आम्ही जागृत सभासद हे सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी लढा देत आहोत. परंतु सत्तेवर असलेले विद्यमान चेअरमन व मॅनेजर हे आम्ही मागितलेली माहिती न देता नेहमीच टाळाटाळ करून अरेरावीची व दमदाटीची भाषा वापरतात. यापुढे आमचा बँक वाचविण्यासाठीचा हा लढा आणखी तीव्र स्वरुपात सुरुच राहणार आहे.
त्यामुळे आम्ही निर्धारित वेळेत लेखी माहिती मागण्यासाठी अर्ज केलेले आहेत.त्याबाबतीतचा आकस ठेवून हे संबंधित लोक आमच्यावर खोटे आरोप करुन अनुचित प्रकार करू शकतात. तरी या संदर्भात संबंधितांना सक्त ताकीद देऊन सहकार क्षेत्रातील ही सर्वसामान्य सभासदांची बँक वाचविण्याकामी आम्हांस सहकार्य करावे.आपले सदैव आभारी राहू.अश्या प्रकारचे निवेदन मर्चंटस् बँकेचे जागृत व लढाऊ सभासद मोहन साहेबराव पाटील, गोपाल के.मारवाडी, ओंकार आबा जाधव,भरत बी.रोकडे, हिराभाऊ वाकडे आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोजताई डी.पाटील आदिंनी शिरपुरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना दिले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा