Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

सक्षम विद्यार्थी घडविण्याचे शिक्षकांपुढे आव्हान डॉ.तुषार रंधे: ज्ञानदीप प्रतिष्ठानतर्फे शिक्षकांचा शिरपूरात गौरव !



अध्ययनामुळे विद्यार्थ्यांवर तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज - प्रा. प्रशांत परदेशी...

शिरपूर, ता. २४ शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेचे स्वरूप नियमित बदलत आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासून त्यांच्यापैकी प्रत्येक जण सर्वार्थाने सक्षम होऊन जागतिक स्पर्धेला कसा सामोरा जाऊ शकेल यादृष्टीने शिक्षकांकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. आपल्याकडून वाढत्या अपेक्षांची जाणीव ठेवून शिक्षकांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवावे, तंत्रज्ञानाची कास धरावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी केले.
         
प्रा. परदेशी म्हणाले, की ज्ञानदान कलात्मक असणे आवश्यक आहे. अध्ययनामुळे विद्यार्थ्यांवर तणाव निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज आहे. शिक्षण हे बदलाचे माध्यम असून, त्याचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा. सत्कारार्थीतर्फे प्रवीण माळी, मदन जाधव, सचिन विखरणकर यांनी मनोगत व्यक्त केले. मनोहर वाघ ज्यांनी प्रास्ताविक, विवेकानंद ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले, योगेश्वर मोरे यांनी आभार मानले. 

गुणवंत शिक्षकांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पत्रकार प्रा. प्रशांत परदेशी, दीपक बोरसे, गटशिक्षणाधिकारी जी. ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान व येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातर्फे गट शिक्षणाधिकारी एल. सुरवाडकर, विस्ताराधिकारी बी. एस. बुबा, आर. सी. पटेल शाळेचे मुख्याध्यापक सी. डी. पाटील, गौरव फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के. भामरे, मंचावर उपस्थित होते. 

पुरस्कार आणि पुरस्कारार्थी

■ (स्व.) दीपक मोरे व (स्व.) नीता मोरे ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार: प्रवीण माळी ( जिल्हा परिषद शाळा, अजंती सीम, ता. चोपडा), नितीन मंगळे (कर्मवीर व्यं. ता. रणधीर विद्यालय, वाडी, ता. शिरपूर), यशवंत निकवाडे (माध्यमिक आश्रमशाळा, वर्षी, ता. शिंदखेडा), फिरोज कुरेशी (आर. सी. पटेल ऊर्दू शाळा, शिरपूर), सदाशिव शेळके ( पालिका शाळा क्रमांक ६, शिरपूर), अशोक पाटील (आर. सी. पटेल प्राथमिक शाळा, शिरपूर), मदन जाधव (आर. सी.पटेल विद्यालय, सावळदे ता. शिरपूर), श्रीमती उषा पावरा (कनोसा इंग्रजी शाळा, आमोदे, ता. शिरपूर).

■ आदर्श क्रीडाशिक्षक पुरस्कार: मयूरी भामरे (एच. आर. पटेल माध्यमिक विद्यालय, शिरपूर).

■ (स्व.) हिरामण कुंभार आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार बाजीराव महाले (जिल्हा परिषद, लाकड्या हमान, ता. शिरपूर).

■ (स्व.) गिरीश मोरे युवा तंत्रस्नेही आदर्श शिक्षक पुरस्कार दिनेश धनगर (जिल्हा परिषद शाळा, वरपाडे, ता. शिंदखेडा), सचिन विखरणकर (साने गुरुजी विद्यालय, विखरण, ता. शिरपूर),
ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश्वर मोरे, कार्याध्यक्ष मनोहर वाघ, उपाध्यक्ष डॉ. दिलीप पाटील, मुरलीधर मोरे, सचिव डॉ. नेहा मोरे, चव्हाण, राहुल पाटील, पंकज पाटील, प्रज्ञेश फुलपगारे, वीरपाल गिरासे, सचिन जढिये, पुरुषोत्तम बागूल, अंकुश जाधव, यज्ञेश पाटील, मोक्षद मोरे, कुणाल पवार, उमेश मोरे, संस्थेचे सदस्य वर्षा पाटील, दुर्गेश मोरे, कुणाल वाघ, खुशी चौधरी, हर्षिता वाघ, पंचायत समिती, शिरपूर यांचे सहकार्य लाभले. 

● पुरस्कार्थी यांना पुरस्कार देऊन गौरविताना डॉ. तुषार रंधे, प्रा. प्रशांत परदेशी, दीपक बोरसे, एम. के. भामरे आदी.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध